Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ranjangaon News : खंडाळे माथा येथे हॉटेलवर दगडफेक करत मागितली खंडणी; एकावर गुन्हा दाखल

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Wednesday, 4 October 2023, 10:45

शेरखान शेख

Ranjangaon News : रांजणगाव गणपती : पुणे-नगर महामार्गावरील खंडाळा माथा येथील आर. के. हॉटेल परमिट रूम येथून घेतलेल्या बियरचे पैसे देत नाही, असे सांगून शेजारील दगड हॉटेलवर फेकून हॉटेलचे नुकसान केले. हॉटेल सुरु ठेवायचे असेल तर महिन्याला पाच हजार रुपये द्यायचे, असे म्हणून खंडणी मागितल्याची घटना रांजणगाव एमआयडीसी परिसरात नुकतीच घडली. याप्रकरणी प्रदीप ऊर्फ पांडा ज्ञानोबा दरवडे याच्याविरुद्ध खंडणीसह शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल

खंडाळा माथा (ता. शिरुर) येथील पुणे-नगर महामार्गालगत असलेल्या आर. के. हॉटेल परमिट रूम येथे प्रदीप दरवडे आला असता, त्याने मद्याची बाटली विकत घेतली. (Ranjangaon News) याचे पैसे मी देणार नाही, असे म्हणून हॉटेलचालक महिलेशी हुज्जत घालू लागला. या वेळी हॉटेल कामगारांनी त्याला हॉटेलच्या बाहेर काढले असता, त्याने बाहेरील दगड उचलून हॉटेलवर फेकून हॉटेलमधील साहित्याचे नुकसान केले.

या वेळी झालेल्या दगडफेकीच्या घटनेमध्ये एक कामगार देखील जखमी झाला. या वेळी प्रदीप याने तुम्हाला हॉटेल सुरु ठेवायचे असेल तर महिन्याला पाच हजार रुपये द्यायचे, असे म्हणून खंडणी मागितली. (Ranjangaon News) त्यांनतर देखील प्रदीप याने हॉटेल कामगारांना फोन करुन तुम्ही सगळे कामगार हॉटेल सोडून जा, नाहीतर तुम्हाला पाहून घेतो, अशी धमकी दिली.

 

याबाबत कमल उत्तम नरवडे (वय ६० वर्षे, रा. खंडाळा माथा, खंडाळे, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.(Ranjangaon News)  त्यानंतर पोलिसांनी प्रदीप उर्फ पांडा दरवडे (रा. खंडाळे, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरुद्ध शिवीगाळ तसेच खंडणी आदी कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वैभव मोरे करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Ranjangaon News : शिक्षकांना शाळाबाह्य अशैक्षणिक कामे बंद करा अन्यथा जिल्हा परिषदेवर आक्रोश महामोर्चा धडकेल – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचा इशारा

Ranjangaon News : जय मल्हार हायस्कूलचे शिक्षक प्रशांत शितोळे यांचा ‘नेशन बिल्डर अवार्ड’ देऊन गौरव

Ranjangaon News : “पी एम स्किल रन”ला टाकळी हाजी मध्ये उस्फूर्त प्रतिसाद.

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16
Next Post

Ranjangaon News : मारण्याची धमकी देऊन, 'फोन पे'वर खंडणी वसूल करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp