Raj Thackeray | पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीमच्या समुद्रात मजार अनधिकृतरित्या बांधली असल्याचा दावा केला आहे. तसेच ती मजार महिन्याभरात हटवली गेली नाही. तर त्याच्या शेजारी गणपतीचं मोठे मंदीर बांधण्याचा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्यावर पालिकेकडून तत्परतेने कारवाई देखील करण्याची माहिती समोर आली आहे.
यावर पुण्यातील हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी राज यांच्या भूमिकेचे स्वागत करत भोंग्यासारखी भूमिका मध्येच ठाकरे यांनी सोडू नये. असा टोला देखील त्यांनी ठाकरे यांना लगावल आहे.
शिवाजी पार्कवर काल झालेल्या गुढीपाडवा मेळाव्याच्या मनसे अध्यक्ष राज यांनी रोजदार राजकीय आरोपांची फटकेबाजी करत मुख्यमंत्री यांनाही चांगलेच धारेवर धरले. तसेच यावेळी अनेक मुद्दे उपस्थित करत गंभीर गोष्टींकडे लक्ष द्या. अन्यथा आम्ही लक्ष देऊ असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.
या सभेतील राज यांनी केलेल्या मुद्यांवर हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.दवे म्हणाले की, ”मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल घेतलेल्या जाहीर सभेत अनेक मुद्यावर भाष्य केले. त्यामध्ये माहीम येथील समुद्रातील दर्ग्या बाबत जी भूमिका मांडली. त्याबाबत आम्हीठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत करतो.
पण भोंग्यासारखी भूमिका मध्येच राज ठाकरे यांनी सोडू नये. तसेच आज सकाळी माहीम येथील समुद्रातील दर्ग्याच्या आजूबाजूच्या परिसरावर कारवाई करण्यात आली आहे. तो दर्गा पूर्णपणे काढण्यात आली नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी अखेरपर्यंत हा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा पुन्हा आजूबाजूला बांधकाम होतील आणि पाहिल्यासारख सुरू होईल.”
पुण्यातील शनिवारवाडा येथील दर्गा बाबत…
मनसे अध्यक्ष राज यांनी माहीम येथील दर्ग्या बाबत जी भूमिका मांडली. त्या प्रमाणेच पुण्यातील शनिवारवाडा येथील जो दर्गा आहे आणि पुण्यश्वर मंदिर परिसरात ज्या मशिदीचे आक्रमण झाले आहे. या दोन्ही बाबत राज ठाकरे बोलतील असे वाटत होते. मात्र त्यांनी त्यावर काही भूमिका मांडली नाही. पण ते भविष्यामध्ये निश्चित भूमिका मांडतील अशी अपेक्षा दवे यांनी व्यक्त केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Raj Thackeray | राज ठाकरे यांच्या विरोधात पिंपरीतील वाकड पोलिस ठाण्यात तक्रार
Traffice Update : शिंदवणे ते वाघापूर या मार्गावरील वाहतूक १ महिन्यासाठी बंद