Railway News : मुंबई : जयपुरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये रेल्वे पोलीस दलातील कॉन्स्टेबलने केलेल्या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. ३१) पहाटे घडली आहे. यामध्ये एका रेल्वे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा व तीन प्रवाश्यांचा समावेश आहे. गोळीबाराची ही घटना वापी ते बोरीवलीमीरा रोड स्थानकादरम्यान घडली. Railway News
पोलीस दलातील कॉन्स्टेबल चेतन सिंह असे गोळीबार केल्याचे नाव आहे. या गोळीबारात रेल्वे पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक टिका राम आणि तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. यानंतर चेतन सिंह याने दहिसर स्थानकात ट्रेनमधून बाहेर उडी टाकत पळ काढला. मात्र, चेतन सिंह याला रिव्हॉल्वरसह ताब्यात घेण्यात आले. अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलाकडून देण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे जयपूर एस मध्ये बी५ मध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. एस्कॉर्ट ड्युटीमध्ये सीटी चेतनने एस्कॉर्ट इनचार्ज एएसआय टिका राम यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती मिळाली. ट्रेन बोरिवली रेल्वे स्थानकावर पोहोचली आहे आणि व्यतिरिक्त ३ नागरीकांचा मृत्यू झाला आहे. वरिष्ठ डीएससी बीसीटी साइटवर येत आहेत. या जवानाला पकडण्यात आले आहे. डीसीपी उत्तर जीआरपीला माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिस प्रवाशांचीही चौकशी करत असून, आरोपीचा हेतू काय होता आणि त्याने हा गोळीबार का केला याची माहिती मिळालेली नाही. चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार होताच ट्रेनमध्ये एकच खळबळ उडाली. सध्या पोलीस रेल्वेतील प्रवाशांचे जबाबही नोंदवत आहेत. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.