-बापू मुळीक
सासवड : पुरंदर तालुका सकल मराठा समाज यांच्याकडून मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या तात्काळ मान्य करून, आमरण उपोषण थांबवावे. यासाठी सकल मराठा पुरंदर तालुका यांच्या वतीने शुक्रवार (दि. 27 सप्टेंबर) रोजी पुरंदर बंद ठेवण्यात येण्यात असल्याचे सासवड पोलीस स्टेशनला निवेदन सादर करण्यात आले.
मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या नऊ दिवसापासून सहाव्यांदा आमरण उपोषण सुरु आहे. त्यामुळे पाटील यांची दिवसेंदिवस प्रकृतीही खूप खालावत चालली आहे. सरकारने अजून पर्यंत कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही. सरकारने पाटील यांच्या सर्व मागण्या तात्काळ मान्य करून, आमरण उपोषण थांबवावे. यासाठी सरकारचा सकल मराठा पुरंदर तालुका यांच्या वतीने प्राथमिक स्वरूपात सासवड पोलीस स्टेशनला निवेदन सादर करण्यात आले. जाहीर निषेध करण्यासाठी शुक्रवार (दि. 27 सप्टेंबर) रोजी सर्व शासकीय, अशासकीय व खाजगी आस्थापना यासाठी पुरंदर बंद ठेवण्यात येणार आहे. यासाठी खुलेपणाने सर्वांनी सहभागी व्हावे, यासाठी जनजागृतीसाठी गुरुवार आहे.
26 सप्टेंबर 2024 रोजी दिवसभर चार गाड्या स्पीकर लावून फिरणार आहेत. त्यामध्ये छोटा हत्ती दोन, कॅरी गाडी एक, ओमनी गाडी एक असे एकूण चार गाडी ही जनजागृती करणार आहेत. यासाठी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पुरंदर च्या तहसीलदार यांना निवेदनाद्वारे सरकारचा निषेध करण्यासाठी 27 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता शिवतीर्थ चौक, सासवड येथे बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा क्रांती मोर्चा पुरंदर यांच्या वतीने करण्यात आले.