Pune News : पुणे : मुलाने बँकेच्या अधिकार्यांशी संगनमत करुन वडिलांच्या मालकीच्या फ्लॅटची कागदपत्रे चोरून आईच्या खोट्या सह्या घेऊन अॅक्सिस तब्बल १ कोटी २० लाख रुपयांचे कर्ज घेतल्याची घटना नुकतीच उघड्कीस आली आहे. याप्रकरणी वडिलांनी आपल्याच मुलावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१८ ते २५ फेब्रुवारी २०२० दरम्यान अॅक्सिस बँकेच्या एस बी रोड शाखेत घडला आहे.
वडिलांनी केला मुलावर गुन्हा दाखल
तपन मुकेश शहा (वय – ३४, रा. सुयोग, दत्तवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. तसेच तत्कालीन अॅक्सिस बँकेचे अधिकारी व डी एस ए एजन्सीचे अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News) याप्रकरणी मुकेश जयंतीलाल शहा (वय ६३, रा. सुयोग, दत्तवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश शहा यांचे किराणा भुसार दुकान आहे. त्यांचा मुलगा तपन हा त्यांच्याबरोबर काम करीत होता. त्याने घराची कागदपत्रे चोरली. (Pune News) कोणतीही परवानगी न घेता ती अॅक्सिस बँकेत कर्जासाठी दिली.
फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या खोट्या सह्या केल्या. अॅक्सिस बँकचे अधिकारी व डीएसए एजन्सीचे अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संगनमत करुन १ कोटी २० लाख रुपयांचे कर्ज घेतले.
दरम्यान, हे कर्ज घेतल्यानंतर तपन शहा हा पळून गेला आहे. (Pune News) मुलगा पळून गेल्यानंतर फिर्यादी यांना या कर्जाबाबत समजले. त्यानंतर त्यांनी आता आपल्या मुलाविरोधात फसवणूकीची तक्रार दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे तपास करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : कार्यकारी अभियंता आर. वाय. पाटील यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कार