Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan : उरुळी कांचन येथील जयश्री गदादे यांच्या नावाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद; श्री गणेशाचे विविध प्रकारची रेखाचित्रे रेखाटण्याचा विक्रम

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 19 September 2023, 13:48

हनुमंत चिकणे
Uruli Kanchan : उरुळी कांचन  : श्री गणेशाचे वेगवेगळ्या प्रकारचे पेन्सिल रेखाचित्र रेखाटण्याचा विक्रम जयश्री सुभाष गदादे (वय ५८, परिवर्तन सोसायटी, उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी रचला आहे. त्यांच्या या विक्रमाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे जयश्री गदादे यांच्यावर उरुळी कांचनसह जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव

यापूर्वी तेलंगणा येथील अत्यम रामदेव या महिलेच्या नावावर श्री गणेशाचे वेगवेगळ्या प्रकारचे सर्वाधिक पेन्सिल रेखाचित्र रेखाटण्याचा विक्रम होता. रामदेव यांचा ३७ रेखचित्रांचा विक्रम मोडून जयश्री गदादे यांनी १४२ रेखाचित्रे रेखाटली आहेत. (Uruli Kanchan) यामध्ये सर्व अष्टविनायक गणपती, गणेशाची विविध नावे व अनेक रूपांमध्ये गणेशाच्या चित्रांचा समावेश आहे. त्यांच्या या चित्रांची २०२३ च्या ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे.

जयश्री गदादे या उरुळी कांचन येथील असून, त्यांचे कुटुंब उच्चशिक्षित आहे. जयश्री यांचे पती सुभाष हे भारतीय रेल्वेतून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा संकेत हा अभियंता असून, त्याने लेखनाचा छंद जोपासला आहे. (Uruli Kanchan) त्याने ‘शहर सोनेरी, ओळख पुणेरी’, ‘द ल्यासी टेल’ ही पुस्तके लिहिली आहेत. तर ‘आहट’ हा काव्यसंग्रह लिहिला आहे. मुलगी निकिता ही आयटी इंजिनिअर म्हणून काम करत आहे.

 

जयश्री यांनी कला शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. जयश्री यांना चित्र रेखाटण्याची खूप आवड आहे. त्यांनी लग्नानंतरही ती आवड जोपासली आहे. (Uruli Kanchan) त्यांनी उरुळी कांचन येथील रांगोळी स्पर्धेत सलग ५ वर्ष प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच त्यांनी सर्वाधिक श्री गणेशाचे वेगवेगळ्या प्रकारचे पेन्सिल रेखाचित्र रेखाटण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.

दरम्यान, इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांनी पुण्यातील सारसबाग गणपती मंदिरामध्ये जयश्री गदादे यांचा पेशवाई शेला, पुष्पगुच्छ, श्रीफळ व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील भा.द.खेर लिखित ‘संजीवन’ कादंबरी देऊन सन्मान केला.

यावेळी सतिश मोहोळ, संकेत गदादे, राजेंद्र ताठे, छाया गदादे, गीता व नितीन गिरमे व रामचंद्र मणेरीकर, अर्जुन डासालकर आदी मान्यवर उपस्थित होते.

‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’साठी तयारी करणार

याबाबत बोलताना जयश्री गदादे म्हणाल्या की, ‘माझ्या चित्रांची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. आता माझी खूप जबाबदारी वाढली आहे. भारतातील सर्व राज्यांच्या नावाने गणपतीचे चित्र रेखाटणार आहे. तसेच आगामी ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये भाग घेण्यासाठी तयारी करणार आहे’.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Uruli Kanchan News : पुणे – सोलापूर महामार्गाशेजारी थाटलेल्या दुकानांमुळे स्थानिक मूर्ती विक्रेत्यांना बसतोय फटका ; खर्च भागवण्यासाठी करावी लागतीये कसरत..

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात ”सायबर क्राईम व महिला सुरक्षा” विषयावर मार्गदर्शन..

Uruli Kanchan News : पुणे – सोलापूर महामार्गाशेजारी थाटलेल्या दुकानांमुळे स्थानिक मूर्ती विक्रेत्यांना बसतोय फटका ; खर्च भागवण्यासाठी करावी लागतीये कसरत..

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34
Next Post

Pune News : काय सांगता..! वडिलांच्या परस्पर फ्लॅटची कागदपत्रे चोरुन मुलाने घेतले १ कोटी २० लाखांचे कर्ज ; दत्तवाडी परिसरातील घटना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.