Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 4 July 2026, 14:34

शिक्रापूर : एमआयडीसी परिसरातील कंपन्यांना नाहक त्रास देणाऱ्या, तसेच बेकायदेशीरपणे कामांचे कंत्राट मागून धमकावणाऱ्या गुंडांविरुद्ध आता थेट खंडणीचे गुन्हे दाखल केले जातील, असा कडक इशारा शिक्रापूर पोलिसांनी दिला आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

शुक्रवारी (दि. 3) शिक्रापूर पोलीस ठाण्यात एमआयडीसीतील विविध कंपन्यांच्या एचआर मॅनेजर्स आणि प्रतिनिधींची एक महत्त्वाची समन्वय बैठक पार पडली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत कंपन्यांच्या सुरक्षिततेबाबत सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीत बेकायदेशीर कंत्राट आणि खंडणीखोरीला आळा घालण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.अनेकदा स्क्रॅप, लेबर, ट्रान्सपोर्ट, केटरिंग, हाऊसकिपिंग किंवा पाणी टँकर यांसारख्या कामांचे ठेके मिळवण्यासाठी काही स्थानिक व्यक्ती किंवा संघटना कंपन्यांवर दबाव आणतात. अशा प्रकारे कोणीही धमक्या देत असेल किंवा पैशांची मागणी करत असेल, तर कंपन्यांनी न घाबरता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा तक्रारींवर पोलीस प्रशासन त्वरित आणि कठोर कायदेशीर पावले उचलणार आहे.

सुरक्षेसाठी या बैठकीत औद्योगिक क्षेत्रातील चोऱ्या रोखणे, वाहतूक कोंडी सोडवणे आणि रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त (पेट्रोलिंग) वाढवणे यांवर प्रामुख्याने चर्चा झाली. तसेच, कंपन्यांनी आपल्याकडे काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांची संपूर्ण माहिती पोलिसांकडे अद्ययावत ठेवावी, अशा सूचनाही देण्यात आल्या. उद्योगांच्या सुरक्षेसाठी पोलीस २४ तास सहकार्य करण्यास तयार आहेत, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

 

या बैठकीला क्रोम वेल इंजिनिअरिंगचे निलेश गव्हाणे, संदीप दिवेकर, जॉन डीअरचे राम अहिरे, अलिकॉनच्या श्रीमती जाधव यांच्यासह अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी आपल्या समस्या मांडून पोलिसांच्या या भूमिकेचे स्वागत केले. या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले, हनुमंत गिरी, उपनिरीक्षक तुषार भोर आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

MH-12 चा जमाना संपला! पहिल्याच दिवशी व्हीआयपी नंबरसाठी पुणेकरांची तुफान गर्दी; चॉइस नंबरसाठी ११०० हून अधिक अर्ज दाखल

Friday, 28 August 2026, 8:02

१७ वर्षांपूर्वीचा कारनामा अन् फसवून लग्न! शिल्पाला छळणाऱ्या गवारे कुटुंबाचा काळा इतिहास समोर; खून, पैसा, प्रॉपर्टी अन् ब्लॅकमेल

Friday, 28 August 2026, 7:30

आज पाऊस पडणार की कडाका वाढणार! हवामान विभागाने दिला इशारा; शेतकऱ्यांची धाकधूक वाढली, वाचा आजच्या हवामानाची ताजी अपडेट

Friday, 28 August 2026, 7:16

Daily Horoscope: रक्षाबंधनाला जुळून आलाय ‘हंस राजयोग’! ‘या’ राशींच्या आयुष्यात होणार मोठी उलथापालथ; वाचा आजचं तुमचं राशिभविष्य

Friday, 28 August 2026, 7:05

पिंपळवंडीतील बालिकेवर अत्याचार-हत्या प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून पीडित कुटुंबाची भेट; प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार

Thursday, 27 August 2026, 22:55

पुणेकरांनो काळजी घ्या! शहरात डेंग्यू अन् स्वाईन फ्लूचा विळखा तीव्र; अवघ्या २५ दिवसांत नोंदवले गेले तब्बल २०५ रुग्ण

Thursday, 27 August 2026, 22:36
Next Post

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp