Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 4 July 2026, 18:03

लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील इंदिरानगरमध्ये शासकीय चरात पडून दोन वर्षीय सोहम लखन कसबे या चिमुकल्याचा झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी शनिवारी (ता. ४) सोहमच्या कुटुंबीयांची त्यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी शोकाकुल आई-वडिलांचे सांत्वन करत, मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्याकडे अधिकृत मागणी केली.

काही दिवसांपूर्वी कदमवाकवस्तीतील इंदिरानगर परिसरात घरासमोर खोदलेल्या आणि पावसाच्या पाण्याने भरलेल्या शासकीय चरात पडून दोन वर्षीय सोहमचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त झाला असून संबंधित ठेकेदाराविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सभापती युवराज काकडे यांनी सोहमचे आई-वडील लखन व शिल्पा कसबे यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या दुर्घटनेमुळे कुटुंबावर मोठे मानसिक व आर्थिक संकट कोसळल्याचे सांगत, शासनाने विशेष बाब म्हणून मदतीचा हात पुढे करावा, अशी भूमिका त्यांनी घेतली.

सभापती युवराज काकडे यांनी याबाबत आमदार ज्ञानेश्वर पंढरीनाथ कटके यांच्याकडे निवेदन सादर करून मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी केली. या मागणीची तात्काळ दखल घेत आमदार कटके यांनी लोणी काळभोर येथील अपर तहसीलदारांना अधिकृत पत्र देत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

आमदार कटके यांनी अपर तहसीलदारांना दिलेल्या पत्रात, कदमवाकवस्ती येथील शासकीय ओढ्याच्या खड्यात पडून मृत्यू झालेल्या दोन वर्षीय सोहम लखन कसबे यांच्या कुटुंबावर मोठे मानसिक व आर्थिक संकट ओढवले असून, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष बाब म्हणून आर्थिक मदत मंजूर होण्यासाठीचा प्रस्ताव सर्व आवश्यक कागदपत्रांसह जिल्हाधिकारी, पुणे यांच्या माध्यमातून तातडीने शासनाकडे सादर करावा, अशी स्पष्ट सूचना केली आहे.

यापूर्वी सभापती युवराज काकडे यांनीही निवेदनाद्वारे या कुटुंबाला तातडीची मदत मिळावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर आमदार कटके यांनी स्वतः पुढाकार घेत प्रशासनाला प्रस्ताव पाठविण्याबाबत निर्देश दिल्याने सोहमच्या कुटुंबाला लवकरच शासनाकडून आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, सभापती युवराज काकडे यांनी सोहमच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून संपूर्ण घटनेची माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष बाब म्हणून आर्थिक मदत मिळण्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठविण्याची विनंती केली. या विनंतीची तत्काळ दखल घेत आमदार कटके यांनी प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या लेखी सूचना दिल्या.

यावेळी सभापती युवराज काकडे आणि पंचायत समिती सदस्य अमोल टेकाळे यांनी दुर्घटनास्थळासह संपूर्ण ओढ्याची प्रत्यक्ष पाहणी केली. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी ओढ्यालगत संरक्षक भिंत उभारणे, आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे तसेच संपूर्ण पालखीतळ परिसराचा नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा  पवार यांची लवकरच भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सभापती युवराज काकडे म्हणाले, “दोन वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याचा मृत्यू ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. ओढ्यालगत आवश्यक संरक्षक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात. तसेच येणाऱ्या वारकऱ्यांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रामपंचायत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन त्वरित कार्यवाही करावी.”

सोहमच्या मृत्यूनंतर संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल झाल्याने कायदेशीर कारवाईला सुरुवात झाली असली, तरी या दुर्घटनेत उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी स्थानिक ग्रामस्थ, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20
Next Post

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.