Pune News : पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातून ड्रॅग्स रॅकेट चालवणारा ड्रॅग्ज माफिया ललित पाटील सोमवारी (ता. २ ऑक्टोबरला) रात्री ससून रुग्णालयातून रात्री एक्स रेचा बहाणा सांगून पळून गेला. अद्याप त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत असून, पोलिसांनी ससून रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. हा गुन्हेगार येरवडा कारागृहातून ससूनमध्ये उपचारासाठी दाखल झाला, त्यावेळी फेरफटाका मारण्याच्या नावाखाली रुग्णालयातून बाहेर पडत असे. पुणे स्टेशन परिसरातील तारांकित हॉटेलमध्ये मुक्कामही करत असे, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.
ललित पाटीलच्या शोधासाठी पुणे पोलीसांची दहा पथके तैनात
ललित पाटील रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता ससून रुग्णालयातून निघाल्यानंतर शेजारी असलेल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलला पोहचला. तिथून रिक्षाने बंडगार्डन पोलीस ठाण्यासमोर आला. तिथे आधीच तयारीत असलेल्या दत्ता डोके याच्या कारमध्ये तो बसला. (Pune News ) तिथून तो रावेतला पोहचला आणि तिथे त्याने दत्ता डोकेची कार सोडली आणि दुसर्या कारमधे बसून तो मुंबईला गेला असं पोलीसांच्या आतापर्यंतच्या तपासात समोर आलं आहे. ललित पाटीलच्या शोधासाठी पुणे पोलीसांनी दहा पथकं तैनात करण्यात आली आहेत.
पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर कोणत्या दिशेने गेला, या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. तो स्टेशन परिसरातील एका तारांकित हॉटेलमध्ये गेला होता.(Pune News ) तेथे त्याच्या नावे एक खोली आरक्षित केली होती. नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी तो बाहेर पडला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. मात्र, तो पसार झाला, ते पुन्हा आलाच नाही. या घटनेची दखल घेऊन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : सणसवाडीत पायी चालणाऱ्या नागरिकांची लूट; काही तासांत दरोडेखोरांना केले जेरबंद
Pune News : छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देवून, २६ लाखांची फसवणूक