Pune News : पुणे : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मुदत दिलेली आहे. ती मुदत संपायला दोन दिवस आहे. सरकार आणि जरांगे पाटलांमध्ये संवाद झाल्याची शक्यता आहे. त्यांनी जर चांगला निर्णय घेतला तर आम्हाला आनंदच आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली आहे.
चांगला निर्णय घेतला तर आम्हाला आनंदच आहे
बारामती येथे नुकतीच शरद पवार यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत वरील प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. (Pune News) मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ ऑक्टोबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. मात्र त्यापूर्वी जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाहीर सभा घेत आहेत.
जरांगे पाटील यांनी पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात सभा घेतल्या. त्यात सरकारला वारंवार २४ ऑक्टोबर म्हणजेच मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला दिलेल्या मुदतीची आठवण करुन दिली आहे. (Pune News) त्यासोबतच मराठ्यांना शांततेत आंदोलन करण्याचे आणि आत्महत्येचे पाऊल न उचलण्याचं आवाहन करत आहे. दरम्यान, जरांगे पाटील आज ते पत्रकारपरिषद घेणार आहेत. त्यात त्यांची पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत. या पत्रकार परिषदेकडे सर्व नेत्यांचं लक्ष लागलं आहे.(Pune News) त्यापूर्वी शरद पवारांनी जरांगे पाटील आणि सराकरमध्ये संवाद झाल्याचं म्हटलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयात रंगला भोंडला महोत्सव