Pune News : पुणे : दिलेले टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा देण्याच्या नावाखाली पैसे गुंतविण्यास सांगून दोन आयटीतील तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. टेलिग्रामवर वेगवेगळे टास्क पूर्ण करुन “वर्क फ्रॉम होम’च्या माध्यमातून जादा पैसे कमविण्याचे आमिष दाखवत या तरुणांच्या खात्यातून सायबर चोरट्यांनी तब्बल 50 लाख रुपयांना गंडा घातला आहे. गेल्या २ महिन्यात अशा प्रकारे किमान ६६ तक्रारी आल्या असून, त्यात तब्बल २० कोटी रुपयांना सायबर चोरट्यांनी गंडा घातला आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये संपूर्ण देशभर अशा प्रकारे पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली सायबर चोरटे लोकांना जाळ्यात ओढून फसवणूक करत आहेत. (The temptation of ‘work from home’)
चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News) विकी गाधे शाम (वय 27, रा. साईनगरी, चंदननगर) व आशिष मुकेश जैन (वय 33, रा.खराडी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीवरून, तक्रारदार हे पुण्यात आयटी कंपनीत नोकरी करतात. त्यांना सायबर चोरट्यांनी व्हॉटसअ्प आणि टेलिग्रामवरुन संपर्क साधला होता. (Pune News) त्यामध्ये टेलिग्राम आयडी जॉइन करण्यास सांगितले. यानंतर वेगवेगळे टास्क देऊन त्या बदल्यात पैसे देण्याचे आमिष दाखवले. मात्र त्यांना टास्कच्या बदल्यात कोणतेही पैसे न देता, त्याच्या बॅंक खात्यातील रक्कम या चोरट्यांनी लाटली. तक्रार विकी यांच्या खात्यातून तब्बल 24 लाख 95 हजाराची रक्कम काढून घेतले तर, आशिष या तरुणाच्या खात्यातून 24 लाख 93 हजार रुपये वर्ग करुन घेतले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : जीवनसाथी डॉट कॉम साईटवरून ओळख झालेल्या तरुणाने तरुणीची केली २३ लाखांची फसवणूक
Pune News : अभिमानास्पद..! इतिहासामध्ये पहिल्यांदा महिलेने चालवली सासवड ते नीरा मार्गावर एस. टी.बस