Pune News : पुणे : पुणे शहर आणि परिसरात लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अल्पवयीन शाळकरी मुलींच्या वयाचा गैरफायदा घेत हे प्रकार सर्रास घडत आहेत. नुकताच पुण्यातील सहकारनगर परिसरातील शाळेत असाच हादरवणारा प्रकार समोर आला आहे. येथील एका शाळेतील ७ ते ८ मुलींचे लैंगिक शोषण झाले आहे. शाळेत मुलींवर अत्याचार झाल्याच्या तक्रारी पालकांकडून आल्यानंतर संतप्त पालकांनी शाळा बंद केली. मनसे कार्यकर्त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणले आहे.
मनसे कार्यकर्त्यांनी प्रकरण उघडकीस आणले
सहकारनगर परिसरातील एका शाळेत मुलींवर अत्याचार झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनेक पालकांकडून मुलींचे लैंगिक शोषण सुरु असल्याचा आरोप करण्यात येत आहे.(Pune News) दरम्यान, मुलींच्या तक्रारीनंतर पालकांनी एकत्रितपणे शाळा बंद करण्याची मागणी केली. यामुळे पोलीस, पालक तसेच यप्रश्नी लक्ष घालणारे मनसे कार्यकर्ते शाळेच्या आवारात जमले आहेत.
मनसे कार्यकर्त्यांनी हे प्रकरण गंभीर असल्याची बाब उघडकीस आणल्यानंतर शाळा बंद करत पालकांची काही तक्रार असल्यास त्यांनी ती पोलीस स्टेशनमध्ये येऊन देण्याचे आवाहन केले आहे. (Pune News) अनेक मुलींच्या तक्रारीनंतर याबाबत पालकांना पोलिसांनी शाळेतील पुढील कार्यवाही करून गुन्हा नोंद करण्याचे आश्वासन दिले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ताथवडे शहरात एकापाठोपाठ तब्बल नऊ गॅस टाक्यांचा स्फोट, ३ स्कूल बस जळाल्या