Pune News : पुणे : भविष्य सांगण्याच्या बहाण्याने तरुणाची लूट केल्याची घटना नुकतीच कोरेगाव पार्क परिसरात घडली आहे. लुटमार करून पलायन केलेल्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत एका तरुणाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
आरोपींनी बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतही एक गुन्हा केल्याचे उघड
रवींद्र अशोक कोळी (वय २५), शिव पवन झंवर (वय २३), मनीष राजेंद्र कोळी (वय २३, तिघे रा. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची सोशल मिडियामुळे तरुणाशी ओळख झाली होती. (Pune News) आपल्याला उत्तम भविष्य सांगता येते, अशी बतावणी त्यांनी तरुणाकडे केली. भविष्य जाणून घेण्यासाठी तरुणाला कोरेगाव पार्क परिसरात बोलावून घेतले. तेथे गेल्यावर शस्त्राचा धाक दाखवून आरोपींनी तरुणाला ऑनलाइन पैसे पाठविण्यास सांगितले. पैसे मिळाल्यानंतर चोरट्यांनी पलायन केले.
दरम्यान, फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली. पोलिसांनी कोरेगाव पार्क परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले. आरोपींनी वापरलेल्या मोटारीचा क्रमांक पोलिसांना मिळाला. (Pune News) आरोपींनी ज्या बँक खात्यात पैसे पाठविण्यास सांगितले होते, ते खाते जळगावमधील एका बँकेतील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस पथक जळगावला रवाना झाले. तेथे पोलिसांना आरोपी सापडले नाहीत. दरम्यान, आरोपी पुणे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी विशाल गाडे आणि प्रवीण पडवळ यांना मिळाली.
पोलिसांच्या पथकाने सापळा लावून आरोपींना ताब्यात घेतले. (Pune News) आरोपींनी बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या परिसरात लुटमारीचा एक गुन्हा केल्याचे तपासात उघडकीस आले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : सासूने नकटी संबोधले; सुनेने सासूच्या हातावर सुरीने सपासप वार केले
Pune News : पुण्यात मध्यरात्री घरात घुसून केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू..