Pune News : पुणे : सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोलकात्याहून पुण्यात आलेल्या एका प्रसिद्ध प्राध्यापकाचा शिवाजीनगरच्या हॉटेल प्राइडमध्ये असलेल्या जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना सहा महिन्यांनंतर उघडकीस आली आहे. २ एप्रिल २०२३ रोजी ही घटना घडली होती. त्यावेळी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, हॉटेल व्यवस्थापन, तसेच जीवरक्षकांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी जीवरक्षक तसेच हॉटेलच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शिवाजीनगर पोलिसांनी केला गुन्हा दाखल
अधिक माहितीनुसार, मोहित प्रमोद आगरवाल (वय ३५, रा. बी. के. पॉल ॲव्हेन्यू, कोलकाता, पश्चिम बंगाल) असे मृत्युमुखी पडलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. (Pune News) याबाबत अमर संतोष मनका (वय ३४, पीटी कोर्टयार्ड सोसायटी खराडी, नगर रस्ता) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार गणेशखिंड रस्त्यावरील प्राईड हॉटेलचे व्यवस्थापन, जलतरण तलावातील जीवरक्षक संजय राजाराम साळवी (वय ३५, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मोहित आगरवाल हे कोलकात्याहून पुण्यात आले होते. एका संस्थेत त्यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. दरम्यान, त्यांनी गणेशखिंड रस्त्यावरील प्राईड हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. (Pune News) फिर्यादी अमन यांच्या मामाचा तो मुलगा होता. घटनेच्या दिवशी देखील ते पुण्यामध्ये लेक्चर घेण्यासाठी आले होते. ते हॉटेल प्राइडच्या रूममध्ये राहिले होते. सकाळी पोहण्यासाठी ते हॉटेलच्या स्विमिंग टॅंकमध्ये उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते गटांगळ्या खाऊ लागले. वाचण्यासाठी हात-पाय मारले. या परिस्थितीत त्याठिकाणी स्विमिंग पूलचा लाईफ गार्ड असणे आवश्यक होते. मात्र, कोणीही हजर नव्हते.
दरम्यान, लाईफ गार्ड संजय साळवी याने थोड्या वेळाने येऊन मोहित यांना पाण्यात न उतरताच हाताला धरून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलला नेण्यात आले. (Pune News) ससून हॉस्पिटलमध्ये मोहित यांना तपासणीपूर्वी मृत घोषित करण्यात आले. या संदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेची अधिक चौकशी केली असता, या प्रकरणात हॉटेल प्रशासन आणि लाइफ गार्डचा हलगर्जीपणा असल्याचे आढळले. मोहित यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Pune News) पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव नाईक करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : कासव, पोपटाची तस्करी करणाऱ्याला वन्यजीव विभागाने घेतले ताब्यात
Pune News : कोलकात्याहून पुण्यात आलेल्या प्राध्यापकाचा हॉटेलच्या जलतरण तलावात बुडून मृत्यू