Pune News : पुणे : जप्त केलेल्या तब्बल पाच कोटी रुपयांचे अंमली पदार्थ रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील खासगी कंपनीच्या भट्टीत जाळण्यात आले. अशी माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली आहे.
रांजणगाव येथील खासगी कंपनीच्या भट्टीत करण्यात आली होळी
पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने, तसेच विविध पोलीस ठाण्यातील पथकांनी ४ कोटी ७५ लाख ५३ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते. (Pune News ) हे अमली पदार्थ नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले होते.
त्यानुसार, पुणे पोलिसांनी ६७ लाख ७८ हजार रुपये किंमतीचा गांजा, एक कोटी ९७ लाख १७ हजार रुपयांचा एक किलो ११४ ग्रॅम मेफेड्रोन, दोन कोटी १३ लाख ९४ हजार रुपयांचे एक किलो ४२६ ग्रॅम कोकेन, १९ लाख ६६ हजार रुपये चरस, दोन लाख ८७ हजार रुपयांचा अफूच्या बोंडांचा चुरा, चार लाख नऊ हजार रुपयांचे हेरॉईन असा अंमली पदार्थांचा साठा नष्ट करण्यात आला आहे.
हि उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली मुद्देमाल नाश समितीचे अध्यक्ष अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, रोहिदास पवार,रासायनिक विश्लेषक जि. भ. सदाकाळ, (Pune News ) न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे क्षेत्र अधिकारी प्र. अ. लेंडे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रमोद डोके, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विठ्ठल बोबडे, एस. के. कोल्हे, पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, सुनील थोपटे आदींनी ही कारवाई केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : सातारा-पुणे महामार्गावर शिरवळ येथे टेम्पो-ट्रकचा भीषण अपघात; तीन जण जागीच ठार
Pune News : गणेशोत्सवातील गर्दीवर १८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर