Pune News : पुणे : विश्वराजबाग येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग व सायन्सचे प्राध्यापक डॉ. मोहन मधुकर कुलकर्णी यांना मेकॅनिकल अभियांत्रिकी विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
डॉ. कुलकर्णी यांना या संशोधनासाठी सर्वोत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार
मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील ‘सोलर कॉन्सेंट्रेटिंग सिस्टममधील अद्ययावत तंत्रज्ञान, त्याची पडताळणी व आधुनिकीकरण’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. डॉ. कुलकर्णी यांना या संशोधनासाठी एक सर्वोत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार मिळाला आहे. (Pune News) यासह ७ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय जर्नल्समधील शोधनिबंधांच्या प्रकाशनासह त्यांच्या नावावर दोन पेटंटची देखील नोंद झाली आहे. डॉ. कुलकर्णी यांना या संशोधनात प्रा. डॉ. डिंगरे यांचे मार्गदर्शन लाभले.
सध्या ते एमआयटी एडीटी विद्यापीठातील स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये वरीष्ठ सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. (Pune News) विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, प्रा. डॉ. सुनिता कराड, अधिष्ठाता प्रा. डॉ. विरेंद्र शेटे, विभागप्रमुख प्रा. सुदर्शन सानप यांनी त्यांचे अभिनंदन केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : ‘भारतीय मनोविज्ञानाचा पाया’ पुस्तकाचा उद्देश कौतुकास्पद : डॉ. विजय भटकर
Pune News : मराठा आंदोलनाला पाठिंब्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती कडकडीत बंद
Pune News : मराठा आरक्षणासाठी नवले पुलावर टायर जाळून आंदोलन करणाऱ्या ५०० जणांविरूद्ध गुन्हा दाखल