Pune News : पुणे : जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. अवघ्या महाराष्ट्रात पोलीस आणि सरकारच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ याठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. या बंदला व्यावसायिकांनी प्रतिसाद दिला आहे. अत्यावश्यक सेवा आणि शाळा-कॉलेज वगळता सर्व बंद असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, खेड तालुक्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.
लोणावळा आणि मावळ येथेही कडकडीत बंद
आळंदी-मरकळ रोडवर मराठा आंदोलकांनी चक्काजाम आंदोलन केले आहे. रस्त्यावर उतरत टायर जाळून सरकारचा निषेध केला. (Pune News) मरकळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत मराठा आंदोलक आक्रमक झाले होते. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करीत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.
जालन्यामध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्राच्या विविध भागात बंदची हाक देण्यात आली आहे. (Pune News) पर्यटननगरी म्हणून ओळख असलेल्या लोणावळ्यात देखील मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. वडगाव, तळेगाव दाभाडे, कामशेतमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सकाळपासून सर्व दुकाने बंद आहेत. शांततेच्या मार्गाने बंद पाळण्यात येत आहे. वैद्यकीय सेवा बंदमधून वगळण्यात आल्या आहेत. या वेळी सर्व व्यवहार ठप्प होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे, पिंपरीत यंदा तृतीयपंथीयांचे गोविंदा पथक फोडणार दहीहंडी…
Pune News : दिवे घाटात बिबट्याचे भरदिवसा रस्त्यावर ठाण; वाहनचालकांची तारांबळ