Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : चौकीच्या दारातच महिला पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला; पोलीस कर्मचार्‍याला अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 4 September 2023, 15:18

Pune News  : पुणे : त्रास देणार्‍या पोलीस कर्मचार्‍याची तक्रार देण्यासाठी सिंहगड रोडवरील अभिरुची पोलीस चौकीत गेलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यावर चौकीच्या दारातच एका पोलीस कर्मचार्‍याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीला आला आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना पायर्‍यांवर ढकलून त्यांचा विनयभंग केला. तसेच अश्लिल शिवीगाळ केली. प्रसंगावधान राखत पोलीस चौकीतील पोलिसांनी तातडीने आरोपीला ताब्यात घेतले आहे. हा प्रकार सिंहगड रोडवरील अभिरुची पोलीस चौकीच्या दारात रविवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास घडला.

अभिरुची पोलीस चौकीतील प्रकार

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सिंहगड रोड पोलिसांनी निलेश आंद्रेस भालेराव (रा. कोले कल्याण पोलीस वसाहत, कलिना, सांताक्रुझ, मुंबई) याला अटक केली आहे.(Pune News )  याबाबत एका महिला पोलीस निरीक्षकांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निलेश भालेराव हा मुंबईत फोर्स वन येथे नेमणूकीला आहे. फिर्यादी २०१८ मध्ये एमआयए येथे नेमणुकीला असताना आरोपी निलेश हा फोर्स वनच्या ट्रेनिंगसाठी आला होता. (Pune News ) या वेळी त्याने फिर्यादीच्या शासकीय कर्तव्यात अडथळा आणून त्यांच्यावर हल्ला करुन विनयभंग केला होता. त्यांनी आरोपीविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

 

काही काळानंतर आरोपीच्या घरच्यांच्या विनंतीवरुन फिर्यादी यांनी तो गुन्हा मागे घेतला होता. गुन्हा मागे घेतल्यानंतरही भालेराव त्यांना वारंवार फोन करुन त्रास देत होता. (Pune News ) त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी या महिला अधिकारी अभिरुची पोलीस चौकीत गेल्या होत्या. पोलिसांनी अदखलपात्र तक्रार घेतल्यानंतर त्या पतीसमवेत घरी जाण्यास निघाल्या.

दरम्यान, त्याचवेळी निलेश तेथे आला. माझा त्रास तुम्ही आणखीन वाढवला, असे सांगून फिर्यादी या चौकीच्या बाहेर जात असताना त्यांच्यावर हल्ला केला. पायर्‍यांवर दरवाजा लगत ढकलून त्यांचा विनयभंग केला. त्यांना अश्लिल शिवीगाळ केली. (Pune News ) पोलीस चौकीतील पोलिसांनी तातडीने निलेश भालेराव याला पकडले. सहायक पोलीस निरीक्षक चंदनशिव या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : मराठा आंदोलनाला खेड तालुक्यात हिंसक वळण; टायर जाळून सरकारचा निषेध

Pune News : पुणे, पिंपरीत यंदा तृतीयपंथीयांचे गोविंदा पथक फोडणार दहीहंडी…

Pune News : गणेशोत्सवासाठी वर्गणी न दिल्याने तरुणाला बेदम मारहाण; पुणे विद्यापीठाच्या आवारात अनुचित प्रकार

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59
Next Post

Pune News : अवघ्या १० रुपयांत रुम बुकींगच्या आमिषाने लाखोंचा गंडा; दिल्लीच्या व्यावसायिकाची पुण्यात फसवणूक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.