Pune News : पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बारामती ‘अ’ गटातून अजित पवार यांनी निवडणुक लढवली होती. गेल्या ३२ वर्षांपासून त्यांनी जिल्हा बँकेच्या संचालकपदाची धुरा सांभाळली. आता संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ती जागा रिक्त झाली असून, तो राजीनामा सहकार निवडणूक प्राधिकरण विभागाकडे जाईल. त्यानंतर संचालक निवड प्रक्रियेची सुरुवात होईल. नवे संचालक पार्थ पवार असावेत, ही सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, अजित पवार जो उमेदवार देतील तो अंतिम असेल, अशी भूमिका आज जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी मांडली.
अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे पार्थ पवार यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळात निवड होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात होती. (Pune News) या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पुणे स्टेशन येथील पुणे जिल्हा बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये झाली. या वेळी दिगंबर दुर्गाडे, संचालक आमदार संजय जगताप, रमेश थोरात हे उपस्थित होते. या बैठकीला अजित पवार वेळेआधीच उपस्थित झाल्याने संचालकांची त्रेधा उजाली.
या बैठकीनंतर बोलताना अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे म्हणाले की, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची दीड वर्षांपूर्वी निवडणुक झाली. त्यावेळी अजित पवार, दिलीप वळसे पाटील हे दोघेजण निवडणुक लढविण्यास इच्छुक नव्हते. पण आमच्या आग्रहास्तव त्यांनी निवडणुक लढवली. (Pune News) मात्र, सध्याचा व्याप लक्षात घेऊन अजित पवार यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला. यापुढील काळात देखील अजितदादांचे मार्गदर्शन बॅंकेला लाभणार आहे.
बॅंकेचे नवे संचालक म्हणून पार्थ पवार यांचे नाव चर्चेत आहे. याबाबत विचारले असता दुर्गाडे म्हणाले की, रिक्त जागेवर लवकरच संचालक निवड प्रक्रियेची सुरुवात होईल.(Pune News) पार्थ पवार हे संचालक म्हणून यावेत, ही सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, अजितदादा जो उमेदवार देतील तोच अंतिम असेल, अशी आमची भूमिका आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : हातावर ब्लेडने वार करून, घेतला गळफास; प्रेमप्रकरणातून तरुणाची आत्महत्या
Pune News : मोबाईल न दिल्याने १६ वर्षीय मुलीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या ; पुण्यातील घटना..
Pune News : अवघ्या चार महिन्यांचे अर्भक प्लॅस्टिक पिशवीत गुंडाळून दिले फेकून