राजेंद्रकुमार शेळके
Pune News : धायरी : धायरी येथील धारेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणी शिबिराचा लाभ तीन हजार मुलांची घेतला. धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. संस्था यावर्षी २५ साव्या वर्षात पदार्पण करत आहे. याचे औचित्य साधून शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला.
धारेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी
या वेळी औंध जिल्हा रुग्णालयामार्फत डॉ. प्राची देशपांडे व डॉ. विशाल देशमुख यांनी आरोग्य तपासणी केली. तपासणीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना चष्मा लागल्याचे निदर्शनास आले आहे, अशा विद्यार्थ्यांना संस्थेच्या पुढाकारातून मोफत चष्मे देण्यात येणार आहेत. (Pune News) हा कार्यक्रम धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. येमपत्ते, निवासी वैद्यकीय अधिकारी वंदना जोशी, जिल्हा कार्यक्रम समन्वयक आशिष पुरणाळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
या कार्यक्रमास खासदार सुप्रिया सुळे, संस्थेचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, संचालक अनिकेत चव्हाण तसेच परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. (Pune News) या वेळी डॉ. प्राची देशपांडे यांनी सुप्रिया सुळे यांना या कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. सुप्रिया सुळे यांनी यावर समाधान व्यक्त केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : किरकोळ भांडणातून तरुणीला ॲसिड फेकून मारण्याची धमकी ; दोघांवर गुन्हा दाखल..