Pune News : पुणे : खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाने विद्यार्थिनीचा वर्गातच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना नवले पूल परिसरात घडली आहे. यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पुन्हा मुलींचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नरेंद्र जुवेकर (वय ५५) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवले पुलाजवळ फुल स्टॉप डेव्हलपर्स हा खाजगी क्लास आहे. या क्लासमध्ये विद्यार्थिनी शिक्षण घेत होती. तर आरोपी नरेंद्र हा त्या क्लासमध्ये कम्युनिकेशनचे शिक्षक म्हणून नोकरी करीत होता.(Pune News) दरम्यान आरोपीने विद्यार्थिनीच्या कपड्यांवर काहीतरी बोलून मनस्ताप दिला.
त्यानंतर विद्यार्थिनीच्या व्हॉट्सअॅपचे स्टेटस पाहून चालू क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांसमोर म्हणाला की, “क्या बुढो के साथ होली खेल रहे हो, मैं तो गोवा जाकर होली खेल रहा था! मेरी दस उंगलीया घी में थी और मेरे चारो बाजू लडकियां थी,” असे मोठ्याने शब्दोच्चार करून, तक्रारदार विद्यार्थिनीचा विनयभंग केला.
याप्रकरणी विद्यार्थिनीने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune News) त्यानुसार आरोपी नरेंद्र जुवेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलां आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक किशोरी साबळे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना सहकारनगर परिसरातून अटक
Pune News : बोपदेव घाटात तरुणीवर अमानुष बलात्कार; दोन नराधमांविरूद्ध गुन्हा दाखल
Pune News : मंगळसूत्र, सोनसाखळी चोरणाऱ्या आकाश सुर्यवंशी टोळीवर ‘मोक्का’