Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर गाव ते रामदरा या रस्त्याचे श्रेय स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी व भाजपाचे,  आमदार अशोक पवार यांनी  फुकटचे श्रेय घेऊ नये, आमदार अशोक पवार यांचे नाव न घेता जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांचा सल्ला…

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 23 September 2023, 13:18

लोणी काळभोर (पुणे)- मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन लोणी काळभोर गाव ते रामदरा, लोणी कंद ते डोंगरगाव या पुर्व हवेलीमधील दोन प्रमुख रस्त्यांसह, शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघातील अठराहुन अधिक रस्त्यांच्या कामासाठीचा निधी हा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात दादा पाटील, आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुर झालेला आहे. मात्र शिरुरचे आमदार अशोक पवार त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुसऱ्यांनी पाठपुरावा केलेल्या विकास कामांचे फुकटचे श्रेय घेऊ नये असा उपरोधक टोला जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी आमदार अशोक पवार यांचे नाव न घेता जोरदार लगावला आहे

लोणी काळभोर गाव ते रामदरा या रस्त्याच्या कामासाठी मिळालेला निधी हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन मिळालेला असताना, संबधित कामांच्या भुमिपुजन पत्रिकेत अथवा फ्लेक्सवर  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अथवा पालकमंत्री यांचे फोटो न छापणे हा प्रकार अत्यंत चुकीचा असल्याची टीकाही  प्रदीप कंद यांनी केली आहे. तसेच या कामाचे भुमिपुजन करताना, शासकीय प्रोटोकॉल न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात पालकमंत्री चंद्रकात दादा पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही प्रदीप कंद यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन मंजुर झालेल्या लोणी काळभोर गाव ते रामदरा या रस्त्याच्या कामाचे भुमिपुजन आज  (शनिवारी) होणार आहे. या भुमिपुजन पत्रिकेत शासकीय प्रोटोकॉल पाळला न गेल्याने, भारतीय जनता पक्षाने या कार्यक्रमावरुन टीकेची झोड उठवली आहे. याबाबत प्रतिक्रिया देतांना जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी आमदार अशोक पवार यांचे नाव न घेता, कंद यांनी पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

 

याबाबत “पुणे प्राईम न्यूज”शी बोलताना प्रदीप कंद म्हणाले, शिरुर-हवेली मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी भरीव निधी मिळण्यासाठी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला जात आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन लोणी काळभोर गाव ते रामदरा,  लोणी कंद ते डोंगरगाव या पुर्व हवेलीमधील दोन प्रमुख रस्त्यांसह, शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघातील अठराहुन अधिक रस्त्यांच्या कामासाठी एकतीस कोटीहुन अधिक रुपयांचा निधी मिळालेला आहे. हा निधी मिळवण्यासाठी लोणी काळभोर, लोणी कंदसह विविध ग्रामपंचायतीचे सरपंच व इतर पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केलेले आहेत. मात्र विद्यमान लोकप्रतिनिधी हे श्रेय स्वतःचे आहे हे दाखवण्यासाठी स्वतःच्या अधिकारात सदर कामांचे भुमिपुजन तो पण शासकीय प्रोटोकॉल टाळून करण्याचा प्रयत्न करत आहेत.

प्रदीप कंद पुढे म्हणाले, जिल्ह्यात रस्त्यांची सर्वत्र मोठी मागणी आहे, राज्यात सरकार आपले आहे, शिरुर-हवेली मतदारसंघातील विविध कामांच्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी आमदार राहुलदादा कुल, भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे, जेष्ठ नेते रोहीदास उंद्रे, राहुल पाचर्णे, हवेलीचे माजी अध्यक्ष संदीप अप्पा भोंडवे, भारतीय जनता पक्षाचे शिरुरचे विद्यमान अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, हवेलीचे अध्यक्ष शामराव गावडे, दोन्ही तालुक्यातील आजी- माजी पदाधिका-यांच्या माध्यमातुन प्रयत्न सुरु आहेत. आम्ही त्याबाबत पाठपुरावा करू, मात्र आमच्या कामाचे श्रेय कोणीही घेऊ नये असेही प्रदीप कंद यांनी यावेळी स्पष्ट केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सकाळी उठल्या उठल्या डोकं दुखतंय? असू शकतो शुगर कमी होण्याचा धोका; वेळीच व्हा सावध

Friday, 19 June 2026, 17:15

पुणे-बंगळुरू महामार्गावरील ‘अडथळा’ कायम! कराड उड्डाणपुलाचे काम पुन्हा रेंगाळले, वाहनचालकांमध्ये संताप

Friday, 19 June 2026, 17:09

6 नव्हे 7 खासदार फुटण्याच्या मार्गावर होते तर 20 ते 25 माजी नगरसेवक अन् काही आमदारही शिंदे गटात जाणार असल्याचा दावा

Friday, 19 June 2026, 16:48

मोहोळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर! मुरलीधर मोहोळ यांच्या वडिलांचे निधन; कुस्तीच्या आखाड्यातील आधार हरपला

Friday, 19 June 2026, 16:31

वाघोलीत कारची काच फोडून चोरट्यांकडून 6 लाखांची रोकड लंपास

Friday, 19 June 2026, 16:19

काळेपडळ येथे घरात घुसून चोरट्याने साडेसात लाखांच्या सोन्याच्या गंठणावर मारला डल्ला

Friday, 19 June 2026, 16:09
Next Post

Pune News : कर्वेनगरमध्ये पीएमपी बसचे ब्रेक फेल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.