Pune News : पुणे : पुणे – कोल्हापूर प्रवास करणाऱ्या प्रवास्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार पुणे – कोल्हापूर – पुणे अशी विशेष गाडी पाच नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
रेल्वेकडून गाडीचे वेळापत्रक जाहीर
दिवाळीच्या काळात पुणे – कोल्हापूर – पुणे अशी दररोज विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. (Pune News ) या गाडीला सर्व महत्वाच्या २० रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे ही गाडी प्रवाशांना खूपच फायदेशीर ठरणार आहे.
या विशेष गाडीला १६ कोच असणार आहेत. या सेवेसाठी महाराष्ट्र एक्स्प्रेसचा रेक वापरण्यात येणार आहे. ५ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर यादरम्यान गाडीच्या ११४ फेऱ्या होणार आहेत. (Pune News ) याबाबतचे नोटीफिकेशन शुक्रवारी (ता.२७) रेल्वे प्रशासनाने काढले आहे. दरम्यान, ही गाडी पुण्यातून रात्री नऊ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार आहे. ती गाडी कोल्हापूर येथे पहाटे ५ वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल. (Pune News ) तर, कोल्हापूर येथून ही गाडी रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून ४५ मिनिटांनी पुण्यात दाखल होईल. असे या विशेष गाडीचे वेळापत्रक रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : भुयारी मेट्रो कामगारांना धमकावून २० हजारांची लूट; कसबा पेठेतील घटना
Pune News : हुंड्यासाठी पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक
Pune News : खडकी येथे नदीपात्रात तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या