Pune News : पुणे : गेल्या महिनाभरापासून वाढत्या दरवाढीने टोमॅटो स्वयंपाक गृहातून जवळपास हद्दपारच झाला होता. टोमॅटोचे भाव सूसाट सुटले होते. आता तेजीत असलेल्या टोमॅटोची आवक वाढल्याने घाऊक बाजारात टोमॅटोच्या दरात घट झाली. नवीन लागवड केलेला टोमॅटोची आवक बाजारात सुरू झाली असून, रविवारी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात नऊ हजार टोमॅटोच्या पेट्यांची आवक झाली.
नऊ हजार टोमॅटोच्या पेट्यांची आवक
गेल्या आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोची आवक दुपटीने वाढली आहे. घाऊक बाजारात दहा किलो टोमॅटोला प्रतवारीनुसार ३०० ते ५०० रुपये असे दर मिळाले आहेत. गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (ता. १३) राज्य, तसेच परराज्यांतून १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. फळभाज्यांची आवक चांगली होत असून, बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
कर्नाटकमधून मिळून १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटकमधून मिळून ४ टेम्पो कोबी, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूतून ४ टेम्पो शेवगा, (Pune News) कर्नाटकातून ४ टेम्पो घेवडा, २ टेम्पो पावटा, गुजरातमधून २ टेम्पो भुईमूग शेंग, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून १० टेम्पो लसूण, आग्रा, इंदूर, तसेच पुणे विभागातून मिळून ४० ट्रक बटाट्याची आवक झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.
पुणे विभागातून सातारी आले ८०० गोणी, टोमॅटो नऊ हजार पेटी, फ्लावर १० टेम्पो, कोबी ४ टेम्पो, पुरंदर, वाई, (Pune News) सातारा भागातून मटार ५ टेम्पो, भेंडी ७ टेम्पो, गवार ५ टेम्पो, भुईमूग शेंग, १०० गोणी, ढोबळी मिरची १० टेम्पो, काकडी १० टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, कांदा ७० ट्रक अशी आवक झाली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : चोरट्यांची कमाल! दागिन्यांसोबतच कारची चावी चोरून, पार्किंगमधील कारही लांबविली…