Pune News : पुणे : डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षणाचे बाजारीकरण झाले असून, विद्यार्थ्यांची लूट करणाचे संतापजनक प्रकार घडत आहेत. विद्यार्थ्यांच्या समस्या आठ दिवसांत सोडवाव्यात, अन्यथा आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे महाविद्यालयाच्या प्राचार्यांना देण्यात आले होते. मात्र, आठ दिवसांनंतर देखील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची दखल न घेतल्याने, अखेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गुरूवारी (ता. ५) ठिय्या आंदोलन केले. सकाळी अकरा वाजता सुरू झालेले हे आंदोलन संध्याकाळी चार वाजेपर्यंत सुरू होते. विद्यार्थ्यांना अडवण्यासाठी पोलीस प्रशासनाला बळाचा वापर करावा लागला.
विद्यार्थ्यांना अडवण्यासाठी पोलीसांना करावा लागला बळाचा वापर
विद्यार्थ्यांनी निवेदनात म्हटल्याप्रमाणे, महाविद्यालयाचे शुल्क वेळेत न भरल्याने विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांचा दंड महाविद्यालय प्रशासन वसुली करत आहे. विद्यार्थ्यांना विलंब शुल्क भरण्यास जोर जबरदस्ती करण्याचे काम महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राचार्य करत होते. (Pune News) जे विद्यार्थी त्यांचे उर्वरित शुल्क व दंड भरत नव्हते, त्यांचे शैक्षणिक नुकसान करण्याचे धोरण महाविद्यालय प्रशासनाने आखले होते, यासंदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी प्राचार्यांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी दिला होता. आठ दिवसांनंतर सुद्धा प्राचार्यांनी विद्यार्थी हिताचा विचार केला नाही. यामुळे अखेर विद्यार्थी परिषदेने ठिय्या आंदोलन केले. दुपारी दोन नंतर विद्यार्थी परिषदेने उग्र रूप धारण केले.
व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा..
https://www.instagram.com/reel/CyDJMwwuHVV/?igshid=MTc4MmM1YmI2Ng==
विद्यार्थी परिषदेचे शिष्टमंडळ डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालयाच्या ट्रस्टी जाधव यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी गेले असता, विद्यापीठ प्रशासान यूजीसीच्या नियमांचे उलघन करून दंड घेत आहे. हा दंड माफ करावा व विद्यार्थांना शुल्क भरण्यासाठी एक महिन्याची मुदत द्यावी, अशा मागण्यांची सकारात्मक चर्चा आनंद भुसणर यांनी प्रशासनसोबत केली. (Pune News) अखेर विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी प्रशासनाने तयारी दर्शवली. शुल्क भरण्यासाठी एक महिन्याची मुदत तसेच विद्यार्थ्यांकडून जो दंड घेतला, तो परत करण्यासाठी एक समिती घोषित केली. यानंतर ६ व ७ ऑक्टोबर या दोन दिवसांत विद्यार्थ्यांनी समितीला अर्ज करावे, त्यानंतर विद्यार्थांना दंड परत दिला जाईल, अशी सकारात्मक चर्चा या वेळी झाली.
दरम्यान, सर्व कार्यवाही पूर्ण होईपर्यंत अभाविप या कामात लक्ष देणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. ‘अभाविप’च्या आंदोलनामुळे शेकडो विद्यार्थ्यांचा लाखो रूपयांचा दंड विद्यार्थांना परत मिळणार आहे. हेच आंदोलनाचे यश असल्याचे मत महानगर मंत्री सिद्धेश्वर लाड यांनी व्यक्त केले. (Pune News) या वेळी उपस्थित महानगर सहमंत्री श्रेया चंदन, सुजल वाळूंजकर, चिराग मोडक आणि सर्व कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भास्कर शिवले प्रथम..
Pune News : आमदार तापकीर म्हणाले, घरावर पाटी लावण्यासाठी सरपंच होऊ नका, तर