Pune News : पुणे : शहरातील ई-वाहनांची संख्या वाढत असल्याने ई-चार्जिंग स्थानके उभारण्याचे धोरण महापालिकेने स्वीकारले आहे. त्यानुसार शहरात ८२ ठिकाणी चार्जिंग स्थानके उभारण्यात येणार आहेत. ठेकेदाराला काम करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र, या कामासंदर्भातील करार महापालिकेने ठेकेदाराबरोबर केला नसल्याची माहिती नुकतीच पुढे आली आहे. असे असतानाही महापालिकेकडून ठेकेदाराला मोक्याच्या जागा देण्यात येत आहेत.
महापालिकेचा भोंगळ कारभार उघड!
पुणे शहरातील ई-वाहनांची वाढती संख्या विचारात घेऊन उद्यान, क्षेत्रीय कार्यालय, नाट्यगृह, रुग्णालय, वाहनतळ येथे चार्जिंग स्थानके उभारण्यासाठी महापालिकेने निविदा काढली होती. त्यानुसार शहरात ८२ ठिकाणी चार्जिंग स्थानके उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. (Pune News) प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर महापालिकेने संबंधित ठेकेदाराला कार्य करण्याचे आदेशही दिले आहेत. मात्र, प्रस्तावानुसार करार केला नसल्याची माहिती पुढे आली आहे.
दरम्यान, याबाबत महापालिकेने काढलेल्या निविदेमध्ये संबंधित कंपनीला मोक्याच्या जागा आठ वर्षांसाठी विनामूल्य वापरता येतील तसेच ठेकेदाराला मिळणाऱ्या नफ्यापैकी ५० टक्के हिस्सा महापालिकेला मिळेल असे म्हटले आहे. याशिवाय मोबाईल ॲप्लिकेशन, वीज मीटर घेणे, चार्जिंगसाठी यंत्रसामग्री, विद्युत देयकाची रक्कम भरणे चार्जिंग स्थानके सुरू ठेवणे, अशा अटी देखील घातल्या आहेत. (Pune News) महापालिकेकडे ठेकेदाराकडून २५ लाख रुपये बँक हमी घेणे यासह इतर अटी आहेत. मात्र, बँक हमी न घेताच ठेकेदारासाठी जागा शोधल्या जात आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : यंदा बाप्पांचे विसर्जन हौदांमध्ये होणार; नदीपात्रात विसर्जनाला महापालिकेची मनाई
Pune News : फटाके घेऊन रेल्वेतून प्रवास; सुरक्षा दलाच्या श्वानाची अचूक नजर… प्रवाशाला अटक!
Pune News : पतीच्या मारहाणीला कंटाळून बिबवेवाडीत नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या