Pune News : पुणे : भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत परंपरेचा अत्युच्च सोहळा असे ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’चे वर्णन केले जाते. पुण्यातील संगीतप्रेमी नागरीक या सोहळ्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. पुणेकर रसिकांची प्रतीक्षा आता संपली आहे.
१३ ते १७ डिसेंबर असे पाच दिवस महोत्सव रंगणार
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा १३ ते १७ डिसेंबर असे पाच दिवस रंगणार आहे.
सवाई गंधर्व महोत्सवाचे यंदा ६९ वे वर्ष आहे. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुलमध्ये महोत्सव होणार असल्याची माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली. शास्त्रीय संगीत प्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या या स्वरयज्ञाला पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून रसिक हजेरी लावतात. यंदाच्या महोत्सवात नेमके कोणत्या दिग्गज कलाकारांचे गायन आणि वादन होणार आहे. (Pune News) यासंदर्भात अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. येत्या काही दिवसांतच कलाकारांच्या नावांचीदेखील घोषणा होणार आहे.
या महोत्सवात गायन, वादन आणि नृत्याचा सुरेल मिलाफ अनुभवायला मिळतो. दरवर्षी देशातील विविध संगीत घराण्यांच्या दिग्गज कलाकारांबरोबरच तरुण कलाकार, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार, तसेच परदेशी कलाकार यामध्ये आपली कला सादर करून रसिकांचे कान आणि मन तृप्त करतात. तरुण कलाकार या महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळणे म्हणजे भाग्य समजतात. (Pune News) पुण्यातील रसिक दर्दी आणि जाणकार असल्याने, या महोत्सवात कला सादर करणे आमच्यासाठी ऊर्जादायी अनुभव असतो, अशी भावना ते व्यक्त करतात.
दरम्यान, संगीतरसिकांच्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांसाठी सुसज्ज पार्किंग, कार्यक्रमाचा आस्वाद रसिक प्रेक्षकांना घेता यावा यासाठी नेहमीप्रमाणे मोठ्या एलईडी स्क्रीन्स, अल्पोपहाराची सोय असणारे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आदी सुविधा महोत्सवाच्या ठिकाणी असणार आहेत.(Pune News) शिवाय मंडपाच्या एका बाजूला संगीत क्षेत्राशी संबंधित विविध उत्पादनांचे तर एका बाजूला प्रायोजकांचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. मंडपाच्या मागील बाजूस पुरुष आणि महिलांसाठी प्रसाधनगृह उभारण्यात येणार आहे.
किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. भीमसेन जोशी यांनी गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ१९५३ पासून ‘सवाई गंधर्व महोत्सव’ आयोजित करायला सुरूवात केली. कालांतराने उपक्रमाची व्याप्ती वाढत गेली अन् कीर्तीही जगभर पसरली. काही वर्षातच शास्त्रीय संगीताला वाहिलेल्या देशभरातील महत्वपूर्ण संगीत महोत्सवात ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ने स्थान मिळविले. पं. भीमसेन जोशी यांच्या निधनानंतर आर्य संगीत प्रसारक मंडळाने महोत्सवाचे नाव ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ केले आहे. (Pune News) शास्त्रीय संगीतातील दिग्गज गायक, वादक आणि नृत्य कलाकारांनी हा स्वरमंच गाजवला आहे. दिग्गजांच्या पुढच्या पिढ्याही या मंचावर स्वतंत्रपणे कला सादर करत आहेत.
यंदा जुन्या जमान्यातील नामवंत प्रकाशचित्रकार वा. ना. भट यांनी पं. भीमसेनजींच्या तरुणपणी काढलेले तब्बल १८ फूट उंचीचे व्यक्तीचित्र रसिकांना पहायला मिळाले होते. (Pune News) त्यामुळे मागील वर्षी हा महोत्सव रंगतदार झाला होता. यंदा मात्र या महोत्सवात वेगळे काय असणार आहे? संगीतप्रेमींसाठी काही नव्या संधी या महोत्वामार्फत उपलब्ध होणार आहे का, असे अनेक प्रश्न संगीतप्रेमींच्या मनात आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : अभिमानास्पद! पुण्यातील दोन मुलांच्या आईने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जिंकली ४ सुवर्णपदके
Pune News : नकटी म्हणून हिणवल्याने सुनेचा-सासूवर चाकूहल्ला ; सासू गंभीर जखमी, पुण्यातील घटना..