Pune News : लोणीकंद, (पुणे) : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करून फरार असलेल्या अल्पवयीनसह दोघांना गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांनी २४ तासाच्या आत ताब्यात घेतले आहे.
ओंकार सुरेश गोसावी वय – २१, रा. सहारा प्रेस्टिजजवळ, जगदाळे निवास, भेकराईनगर, फुरसुंगी, ता. हवेली) व एक अल्पवयीन असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील जबरी चोरी, घरफोडी व वाहन चोरी या गुन्ह्यांना आळा बसावा या करिता मोहीम राबवून कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिल्या होत्या.
तब्बल ३ लाख ४७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
शनिवारी (ता. ०९) युनिट सहाचे पथक गस्त घालीत असताना पोलीस शिपाई ज्योती काळे व सचिन पवार यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतिल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट येथे थांबलेला आहे. सदरची माहिती वरिष्ठांना कळवून त्यांनी दिलेल्या आदेशानुसार आरोपीवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार सदर इसमास पोलिसांनी दुचाकीसह ताब्यात घेतले नमूद गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. विश्वासात घेऊन अधिक तपास केला असता सदरचा गुन्हा त्याने त्याचा अल्पवयीन साथीदार याच्यासमवेत केल्याची कबुली पोलिसांना दिली.
दरम्यान अल्पवयीन मुलाचा शोध घेतला असता तो फुरसुंगी परिसरात असल्याची माहिती तांत्रिक विश्लेषन द्वारे मिळाली. ओंकार गोसावी सह जावून शोध घेतला असता तो फाटे कॉलनी येथे रस्त्याने पायी चालत असलेला मिळून आला. त्याच्याकडून पोलिसांनी वेगवेगळ्या कंपनीचे ०५ मोबाईल हँडसेट, सोन्या चांदीचे दागिने असा तब्बल ३ लाख ४७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी वरीष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, भैरवनाथ शेळके, पोलीस हवालदार मच्छिंद्र वाळके, पोलीस नाईक विठ्ठल खेडकर, संभाजी सकटे, रमेश मेमाने, नितीन मुंढे, प्रतीक लाहीगुडे, प्रमोद मोहिते, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश टिळेकर, अशफाक मुलाणी, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे, सुहास तांबेकर पथकाने केलेली आहे.