Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पोळा सणावरही महागाईचे संकट; साहित्यांच्या दरात 20 ते 30 टक्के वाढ

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Tuesday, 12 September 2023, 18:16

शिरूर  : शेतात कष्ट करणाऱ्या बैलाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा सण साजरा केला जातो. गुरूवारी (ता. 14) हा सण पारंपारिक पद्धतीने साजरा केला जाणार आहे. या सणासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या असून, सणासाठी लागणारे विविध साहित्यांची दुकाने देखील सजलेली पाहावयास मिळत आहेत. यावर्षी रखडलेला पाऊस त्यातून या साहित्यांची 20 ते 30 टक्के दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

ग्रामीण संस्कृतीचा एक अविभाज्य घटक असलेला पोळा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावर्षी पाऊस कमी असल्याने पिकांची स्थिती चांगली नाही. जोडीला महागाईने तोंड वर काढले आहे. शेतातील कांदा, टोमॅटोला बाजारभाव नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात पैसा नाही. महागाई असली तरी बळीराजा सर्जा राजाला सजविल्याशिवाय राहत नाही. साहित्यांच्या दरात 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली असली तरी बाजारपेठांमध्ये बैलपोळ्याच्या खरेदीसाठी गर्दी कमी झाली नाही. बैलपोळा हा शेतकऱ्यांचा महत्वाचा सण आहे. जिव्हाळ्याचा व पारंपारिक आणि लोकसंस्कृतीचा वारसा लाभलेल्या या सणावर यंदा महागाईचे सावट आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत महागाई वाढल्यामुळे बैलाच्या सजावटीसाठी आवश्यक साहित्यांचे दर 20 ते 30 टक्क्यांनी वाढले आहेत. पोळा साहित्याची दुकाने ग्रामीण भागात सजली आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी बाजारात साहित्याची अधिकच्या दरात खरेदी करावी लागत असल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहे.

दरवर्षी पोळा सणाला बैलांसाठी नवीन साहित्य खरेदी करून त्यांची सजावट करणाऱ्या काही शेतकऱ्यांनी बाजाराकडे पाठ फिरवून जुनेच साहित्य वापरण्याचा पर्याय निवडला आहे. पोळ्यासाठी मातीचे बैल विक्री करणारे व्यावसायिक विविध रंगी बैलजोड्या घेऊन बाजारात दाखल झाले आहे. वर्षभर राबणाऱ्या बैलांना पोळ्यासाठी रंगीबेरंगी झुल, नवीन कासरे व इतर साहित्य बाजारात दिसू लागली आहेत.

 
युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे महापालिका भरतीत कॉपीचा खेळ! ‘मॉडर्न स्टाइल’ने परीक्षा दिली, चष्म्याने केला घात; तपासात धक्कादायक खुलासा!

Tuesday, 1 September 2026, 12:31

पुणेकरांच्या खिशाला कात्री!आजपासून रिक्षाभाडेवाढ लागू; प्रत्येक KM साठी मोजावे लागणार एवढे रुपये

Tuesday, 1 September 2026, 12:07

ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का? 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा

Tuesday, 1 September 2026, 11:36

अण्णा हजारेंची प्रकृती अचानक बिघडली! मुंबईतील रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली महत्वाची अपडेट

Tuesday, 1 September 2026, 11:24

सासवडच्या ‘द फॉरेस्ट’ हॉटेलवर पोलिसांचा छापा; अवैध हुक्का बारचा पर्दाफाश, 52 हजारांचा मुद्देमाल जप्त

Tuesday, 1 September 2026, 11:23

गायरानात बकरी चारण्यावरून वाद; मेंढपाळाला दगडाने मारहाण, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Tuesday, 1 September 2026, 11:16
Next Post

पर्यावरण वाचवू या...मातीचा गणपती घेऊ या...; 'अशी' घरीच बनवा मातीची गणेशमूर्ती...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp