Pune News : पुणे : पुण्यातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालयाचे डीन आशिष बनगीनवार यांना वैद्यकीय प्रवेशासाठी १६ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतीच अटक केली होती. त्यानंतर ससून रुग्णालयात लाच प्रकरणात एका लिपिकास पकडले गेले. या प्रकरणी ससून रुग्णालयाकडून मोठी पावले उचलली गेली. या विभागाचे प्रमुख असलेले अधीक्षक डॉ.यल्लापा जाधव यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सूक्ष्म जीव विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनील भामरे यांची नियुक्ती केली आहे.
अधीक्षक डॉ.यल्लापा जाधव यांची तडकाफडकी उचलबांगडी
ससून रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक गणेश सुरेश गायकवाड (वय ४९) याला पकडण्यात आले. वैद्यकीय बिलात त्रुटी न काढण्यासाठी अडीच हजारांची लाच घेताना त्याला अटक झाली. ससूनच्या अधीक्षक कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत ही कारवाई केली. (Pune News ) तक्रारदार महिला या शासकीय सेवक आहेत. त्यांच्या १ लाख ७ हजार रुपयांच्या वैद्यकीय बिलाची फाईल मंजुरीसाठी प्रलंबित असल्याने गायकवाड याने अडीच हजारांची लाच मागितली होती.
दरम्यान, लाचखोर लिपिकाला एसीबीने पकडल्यामुळे या विभागाचे प्रमुख असलेले अधीक्षक डॉ. यल्लापा जाधव यांना या पदावरून हटवण्यात आले आहे.(Pune News ) ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी ही कारवाई केली असून, त्यांच्या जागी सूक्ष्म जीव विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनील भामरे यांची नियुक्ती केली आहे. लाचखोराला पकडल्यानंतर तासाभरात ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, वैद्यकीय बिले पास करण्याचा अधिकार लिपिकाला नसतो. यामुळेच संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन कारवाई करण्यात आली आहे. ससून रुग्णालयात नक्की काय सुरु आहे, असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे मेट्रो स्टेशन बांधकामावेळी कारच्या बोनेटवर लोखंड पडून भीषण अपघात
Pune News : भरधाव लॅम्बोर्गिनीच्या धडकेत श्वानाचा मृत्यू; पुण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल
Pune News : फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषद स्थापनेच्या प्रक्रियेला खो ; भवितव्य अधांतरी!