Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yevat News : इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्टचा उत्कृष्ट महिला फिजिओ पुरस्कार डॉ. मृण्मयी अवचट यांना प्रदान..

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Friday, 11 August 2023, 13:49

Yevat News : यवत, (पुणे) : इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट उत्कृष्ट महिला फिजिओ पुरस्कार डॉ. मृण्मयी विवेक अवचट यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

 

“उत्कृष्ट महिला फिजिओ”

इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट उत्कृष्ट महिला फिजिओ पुरस्कार प्रदान वितरण सोहळा नुकताच कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया, नवी दिल्ली येथे पार पडला असून यावेळी आय.ए.पी महिला सेलच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्रातील एकमेव डॉ. मृण्मयी अवचट यांना उत्कृष्ट महिला फिजिओ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. Yevat News

इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट (IAP) च्या महिला सेल कॉन्फरन्समध्ये भारतीय जनता पार्टी जम्मू-काश्मीरचे खासदार गुलाम अली खताना, जी 20 ऑपरेशनल हेड साक्षी वर्मा व जागतिक फिजिओथेरपीचे अध्यक्ष प्रा. मिशेल लँड्री यांच्या हस्ते डॉ. मृण्मयी अवचट यांना “उत्कृष्ट महिला फिजिओ” म्हणून सन्मानित करण्यात आले. Yevat News

डॉ. मृण्मयी विवेक अवचट (एमपी.टीएच – अस्थिरोग – क्रीडा ) (ऑस्ट्रेलिया) (परस्युइंग) पदवी प्राप्त केले असून सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे येथे विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. हा कार्यक्रम मोदीजींच्या फिट इंडियाचा एक भाग होता.

डॉ. मृण्मयी अवचट यांना २०१७ रोजी तेजस्विनी मंच मार्फत तात्कालीन महापौर मुक्ता टिळक व आमदार माधुरी मिसाळ, नगरसेविका मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते नवदुर्गा शक्ती पुरस्कार, २०१८ मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यु. जी संस्थेद्वारे फिजिओथेरपी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल “सर्वोत्कृष्ट प्रख्यात अल्युमी” पुरस्कार, २०२१ रोजी देऊन सन्मानित करण्यात असून कोरोना महामारी काळात कर्वे रोड येथील संजीवन रुग्णालयात मुख्य वरिष्ठ फिजिओथेरपिस्ट सल्लागार म्हणून काम केले आहे. Yevat News

डॉ. मृण्मयी अवचट यांनी ऑस्टियोपॅथी आणि मॅन्युअल थेरपी (एफओएमटी) (ऑस्ट्रेलिया) मध्ये फेलोशिप, राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ, बंगलोर (कर्नाटक) बेंगलोर येथे एमपीटी (अस्थिरोग आणि स्पोर्ट्स) महाविद्यालयात कायम १ ल्या व ३ ऱ्या क्रमांकावर राहिला, तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथे बीपीटी मध्ये पदवी प्राप्त केले असून गेल्या १३ वर्षापासून कार्यरत आहेत.

यामध्ये सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे येथे विभाग प्रमुख (HOD) म्हणून सामान्य रुग्णालय आणि विशेष विभागासाठी संपूर्ण विभाग स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे तर यापूर्वी एमजेएम हॉस्पिटल येथे भौतिकशास्त्र तज्ञ सल्लागार म्हणून तर संजीवन हॉस्पिटल पुणे येथे मुख्य फिजिओ विभागाचे सर्वांगीण कल्याण, रुग्ण आणि प्रशासनाचा दर्जा सुधारणे यासारख्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

तसेच सामाजिक उपक्रमात देखील सहभाग घेत असून डिसेंबर २०१६ मध्ये पुणे मॅरेथॉन कॅम्प, नोव्हेंबर २०१९ मध्ये गरजू रुग्णांसाठी आयोजित केलेल्या जॉइंट रिप्लेसमेंट कॅम्प मध्ये १५० रुग्णांना हाडांच्या समस्यांबाबत फायदा झाला, २०१५ मध्ये बारामतीतील वंचित रुग्णांसाठी मोफत ऑर्थो आणि फिजिओथेरपी कॅम्प, सुतारदरा परिसरात मोफत ऑर्थो आरोग्य तपासणी शिबीर, २०२२ मध्ये महिला दिनानिमित्त कोथरूड परिसरातील वंचित महिलांसाठी आरोग्य आठवडा शिबिर, “सुरक्षित रुग्ण काळजी हाताळणी सल्ला आणि महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता” या विषयावर अर्गोनॉमिक जागरूकता चर्चासत्र, मार्च २०२१ मध्ये पुणे येथील एमआयएम रुग्णालयात महिला दिनानिमित्त आरोग्य सेवा व्यावसायिक शिबिर, सुरक्षित रुग्ण काळजी यावर अर्गोनॉमिक जागरूकता चर्चा सत्र, मे २०२१ मध्ये नर्सिंगडे निमित्ताने सर्व नर्सिंग स्टाफसाठी “हाताळणी सल्ला” आदि सार्वजनिक सहभाग घेतला आहे.

पुरस्कार मिळाल्याबद्दल मनोगत व्यक्त करताना पालकांचा बिनशर्त प्रेम व पाठिंब्यामुळे तसेच गुरु डॉ. उज्ज्वल येवले यांच्या मार्गदर्शनामुळे व सहकार्यामुळे हे शक्य झाले असून या अशा आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात सन्मानित केल्याबद्दल डॉ. संजीव झा व डॉ. रुची वार्ष्णेय यांचे आभार व्यक्त केले. तर यापुढील देखील अशाच प्रकारे समाजकार्य व रुग्णांची सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल असे डॉ. मृण्मयी अवचट यांनी सांगितले.

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

Pimpri News : कस्टम विभागाने कुरिअर पकडल्याचे सांगत महिलेला ३६ लाखांना गंडा; एकाला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.