Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 5 July 2026, 20:34

सांगली : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेटफळे गावात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. घरात एकट्या राहणाऱ्या वृद्ध महिलेवर अज्ञात व्यक्तीने हल्ला करून त्यांच्या अंगावरील दागिने लुटल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांना जिवंत पेटवून दिल्याची घटना समोर आली असून, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव मालन मारुती जाधव असे आहे. त्यांच्या मुलगा विठ्ठल मारुती जाधव यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मालन जाधव या शेटफळे गावात एकट्याच राहत होत्या. ३० जून रोजी पहाटे त्या लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या होत्या. त्या परत घरात येत असताना अज्ञात व्यक्ती त्यांच्या मागोमाग घरात शिरल्याचा संशय आहे.

 

घरात प्रवेश केल्यानंतर आरोपीने मालन जाधव यांच्यावर हल्ला करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने त्यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावल्याचा आरोप आहे. घटना घडल्यानंतर आरोपी तेथून पसार झाला.

आगीमुळे गंभीर भाजलेल्या मालन जाधव यांचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. त्यानंतर त्यांना तातडीने सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावत गेली आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणामुळे शेटफळे गावासह परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला असून, विविध अंगांनी तपास केला जात आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी विशेष पथकेही काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53

व्हाट्सअँप डीपीवर कंपनी संचालकाचा फोटो लावून 20 लाखांची फसवणूक; राजगड पोलिसांत गुन्हा दाखल

Saturday, 25 July 2026, 20:42

नसरापूर येथे मद्यधुंद अवस्थेत कार चालविणाऱ्या चालकावर राजगड पोलिसांची कारवाई

Saturday, 25 July 2026, 20:35
Next Post

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.