Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 5 July 2026, 21:16

अकोले : अकोले तालुक्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्ञानवर्धिनी बालक मंदिर आणि मॉडर्न हायस्कूलमध्ये नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. ज्ञानवर्धिनी बालक मंदिरच्या चेअरमनपदी ज्येष्ठ पत्रकार अमोल वैद्य, मॉडर्न हायस्कूलच्या चेअरमनपदी सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुलकर्णी, तर हिंद सेवा मंडळ संचलित अकोले विभागाच्या प्रशासकीय अधिकारीपदी सेवानिवृत्त प्राचार्य संतोष कचरे यांची निवड करण्यात आली आहे.

अमोल वैद्य यांनी एम.ए., बी.एड. तसेच पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून ते सध्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय त्यांनी सुगाव खुर्दचे माजी सरपंच, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, रोटरी क्लब अकोलेचे संस्थापक आणि रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२ चे माजी असिस्टंट गव्हर्नर म्हणून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या अनुभवाची दखल घेत त्यांच्यावर चेअरमनपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

प्रशासकीय अधिकारीपदी निवड झालेले संतोष कचरे हे सेवानिवृत्त प्राचार्य असून ते जनजाती कल्याण समितीचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी मॉडर्न हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम केले आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

प्रतिमा कुलकर्णी यांनी एम.ए., बी.एड. शिक्षण पूर्ण केले असून त्यांनी शिक्षक म्हणून काम केले आहे. त्यांनी अनेक वर्षे प्रयोगशील ‘बाल आनंदवाडी’ चालवली असून सध्या एकल महिलांचे प्रश्न आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सामाजिक कार्य करत आहेत. विविध सामाजिक उपक्रमांमधील त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांची मॉडर्न हायस्कूलच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे.

 

या तिन्ही मान्यवरांच्या निवडीबद्दल हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष सुमतीलाल कोठारी, संचालक दिलीपकुमार शहा, सचिव सहाय्यक योगेश देशमुख, मॉडर्न ज्युनिअर कॉलेजचे चेअरमन तथा नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, मंडळाचे पदाधिकारी, स्थानिक शाळा समितीचे सदस्य, पालक आणि विविध क्षेत्रातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्याच्या मानकरी बाप्पांना निरोप! ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन संपन्न

Friday, 25 September 2026, 22:10

अन् तिने पैशांसाठी स्वतःच्या लेकराला विकलं! लिव्ह-इन रिलेशनशिपमधून गरोदर राहिली अन् दारुड्या बॉयफ्रेंडला कंटाळून बाळाचा सौदा

Friday, 25 September 2026, 21:37

शिरूर पूर्वभागात डीजेच्या दणदणाटाला फाटा! टाळ-मृदंगाच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप; पोलिसांकडून कौतुक

Friday, 25 September 2026, 21:16

गणेशोत्सवात शिक्रापूर पोलिसांचा दुहेरी फोकस! सायबर फ्रॉडसह महिला सुरक्षेबाबत जनजागृती; २७ गणेश मंडळांना भेट

Friday, 25 September 2026, 21:01

‘तिच्यासोबतचे संबंध तोड’ रिक्षाचालकाला वारंवार बजावलं अन् नंतर खुनाचा थरार; कारखाली चिरडण्याचा प्रयत्न, पाईपने डोक्यावर हल्ला अन्…

Friday, 25 September 2026, 20:51

सहा दशकांची परंपरा जपत देवभूमी तीर्थक्षेत्र पिंपरी दुमाला येथे लाडक्या बाप्पाला निरोप

Friday, 25 September 2026, 20:38
Next Post

Playbison Casino – Live Promocje Niesamowite Promocje i Natychmiastowe Bonusy w Polsce

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp