Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अन् तिने पैशांसाठी स्वतःच्या लेकराला विकलं! लिव्ह-इन रिलेशनशिपमधून गरोदर राहिली अन् दारुड्या बॉयफ्रेंडला कंटाळून बाळाचा सौदा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 25 September 2026, 21:37

छत्रपती संभाजीनगर : जन्माला येऊन अवघा महिना झालेल्या बाळाची १ लाख २० हजार रुपयांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार मुकुंदवाडी परिसरात समोर आला आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमधून जन्मलेल्या या बाळाची जन्मदात्या आई-वडिलांनीच विक्री केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी बाळाची बेकायदेशीर खरेदी करणाऱ्या मायलेकींसह जन्मदात्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकुंदवाडी पोलिसांनी चौघांना अटक केली असून, सीमा अनिल रेशवाल आणि तिची आई कौशल्या बारकू पवार यांना न्यायालयाने २९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

बाळाची ३६ वर्षीय आई गेल्या काही वर्षांपासून मुंबईत राहत होती. पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर ती गेल्या तीन वर्षांपासून ३४ वर्षीय प्रियकरासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. तिचा प्रियकरही पत्नी आणि मुलाला सोडून राहत असल्याचे तपासात समोर आले आहे. तो दारूच्या आहारी गेल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे.

५ जुलै रोजी या महिलेने घाटी रुग्णालयात मुलाला जन्म दिला. त्याच काळात रुग्णालयात तिची ओळख संजयनगर परिसरात राहणाऱ्या ६५ वर्षीय कौशल्या बारकू पवार यांच्याशी झाली. कौशल्या या स्वयंपाकाचे काम करतात. ओळखीचा फायदा घेत त्यांनी बाळाच्या आईच्या परिस्थितीबाबत तिच्या मनात भीती निर्माण केली. ‘तुझा नवरा दारू पितो, तो तुझा आणि बाळाचा सांभाळ कसा करणार?’ असे सांगून त्यांनी आईला भावनिकदृष्ट्या प्रभावित केल्याचे तपासात समोर आले.

यानंतर कौशल्या यांनी त्यांची मुलगी सीमा बाळ घेण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. ‘माझी मुलगी बाळ घेते, ते तिला दे. आम्ही त्याचा नीट सांभाळ करू,’ असे सांगून मायलेकींनी आई-वडिलांना विश्वासात घेतले. सुरुवातीला आईने बाळ देण्यास नकार दिला. मात्र, पुढे दोघींनी तिचे मन वळवले. अखेर ऑगस्ट महिन्यात बाळ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

८ ऑगस्ट रोजी सीमा रेशवाल हिने १ लाख २० हजार रुपये रोख दिले. तसेच बॉण्ड पेपरवर बाळ खरेदी केल्याचा व्यवहार लिहून घेतला. अशाप्रकारे अवघ्या महिनाभराच्या बाळाचा पैशांत सौदा करण्यात आला.

बाळ आईपासून दूर गेल्यानंतर काही दिवसांतच तिचे मन बदलले. बाळाची आठवण येऊ लागल्याने तिने सीमा रेशवालकडे चिमुरड्याला परत देण्याची विनंती केली. मात्र, सीमा हिने बाळ आपल्याकडे नसल्याचे सांगून टाळाटाळ केली. ‘बाळ माझ्या बहिणीकडे दिले आहे, उद्या आणून देते,’ असे सांगून तिने बाळ परत केले नाही. वारंवार विनंती करूनही बाळ मिळत नसल्याने अखेर आईने मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठले आणि पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे यांच्याकडे तक्रार केली.

त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरेश्वर घुगे, सहायक फौजदार अशोक कचरे आणि अंमलदार राजाभाऊ कोल्हे यांनी तपास केला. या तपासात सीमा रेशवाल हिची गुन्हेगारी पार्श्वभूमीही समोर आली. तिच्याविरुद्ध २०२० मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी २४ सप्टेंबर रोजी सरकारतर्फे फिर्याद दाखल करून या प्रकरणात गुन्हा नोंदवला. त्यानंतर सीमा रेशवाल आणि कौशल्या पवार यांना अटक करण्यात आली. पोलिस कोठडीतही सीमा या प्रकरणाबाबत अधिक माहिती देण्यास तयार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

हडपसर येथील वॉव स्टे लॉजमधील खोलीत वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या; तरुणाला अटक

Friday, 25 September 2026, 22:45

पुण्याच्या मानकरी बाप्पांना निरोप! ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन संपन्न

Friday, 25 September 2026, 22:10

अन् तिने पैशांसाठी स्वतःच्या लेकराला विकलं! लिव्ह-इन रिलेशनशिपमधून गरोदर राहिली अन् दारुड्या बॉयफ्रेंडला कंटाळून बाळाचा सौदा

Friday, 25 September 2026, 21:37

शिरूर पूर्वभागात डीजेच्या दणदणाटाला फाटा! टाळ-मृदंगाच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप; पोलिसांकडून कौतुक

Friday, 25 September 2026, 21:16

गणेशोत्सवात शिक्रापूर पोलिसांचा दुहेरी फोकस! सायबर फ्रॉडसह महिला सुरक्षेबाबत जनजागृती; २७ गणेश मंडळांना भेट

Friday, 25 September 2026, 21:01

‘तिच्यासोबतचे संबंध तोड’ रिक्षाचालकाला वारंवार बजावलं अन् नंतर खुनाचा थरार; कारखाली चिरडण्याचा प्रयत्न, पाईपने डोक्यावर हल्ला अन्…

Friday, 25 September 2026, 20:51
Next Post

पुण्याच्या मानकरी बाप्पांना निरोप! ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन संपन्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp