Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हडपसर येथील वॉव स्टे लॉजमधील खोलीत वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या; आरोपी वकिलाला अटक

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 25 September 2026, 22:45

हडपसर, ता. २५ : हडपसर येथील वॉव स्टे लॉजमधील एका खोलीत २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून गुरुवारी (दि. २४) सकाळी उघडकीस आली आहे. तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून हडपसर पोलिसांनी एका वकिलाला अटक केली आहे.

साक्षी संतोष गायकवाड (वय २२) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर विश्वास वामनराव जगताप (देशमुख) (वय २३, रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी वकिलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी ही पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये एलएल. बी. च्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होती. सन २०२२ मध्ये साक्षी ही कायद्याच्या प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) क्लाससाठी हिवरे येथून डेक्कनला ये-जा करीत होती. त्यावेळी सासवड येथील विश्वास जगताप हा साक्षीला त्रास देत असल्याचे तिने वडिलांना सांगितल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर साक्षीच्या वडिलांनी विश्वास आणि त्याच्या चुलत्याला घरी बोलावून समज दिली होती. भविष्यात साक्षीला त्रास देणार नाही, असे विश्वासने सांगितल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.

दरम्यान, २४ सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास विश्वास हा साक्षीला हडपसर येथील वॉव स्टे लॉजमधील खोलीत घेऊन गेला, अशी माहिती तिच्या वडिलांनी पोलिसांना दिली. खोलीत दोघांमध्ये वाद झाल्यानंतर साक्षीने आत्महत्या केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

 

या घटनेनंतर विश्वासने साक्षीला ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केले. याची माहिती मिळाल्यानंतर साक्षीचे वडील संतोष गायकवाड यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून विश्वास जगताप याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रत्नदिप बिराजदार करीत आहेत.

हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे, सहायक पोलीस निरीक्षक अर्चना गाढवे, पोलीस उपनिरीक्षक शुभम शिंदे यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची कार्यवाही केली.

साक्षीच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती, लॉजमधील घटनाक्रम आणि दोघांमधील वादाचे कारण याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. आरोपीवरील आरोप हे फिर्यादीत नमूद केलेल्या माहितीनुसार असून, त्यांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

UP निवडणुकीत Gen-Z योगींच्या बाजूने? सलग तिसऱ्यांदा भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता; सर्व्हेतील आकडेवारीने राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 16 October 2026, 23:01

MPSC पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढेची एंट्री! चौकशीसाठी स्थापन केलेल्या आयोगाच्या समितीत मुंढेंची नियुक्ती; ‘या’ IAS अधिकाऱ्यांकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार

Friday, 16 October 2026, 20:54

शेतकऱ्यांसाठी धावून आले राज्यातले IAS आणि IPS अधिकारी! राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार स्वतःचा १ दिवसाचा पगार; वाचा सविस्तर

Friday, 16 October 2026, 20:40

पुढच्या वर्षीपासून लागू होणार ८वा वेतन आयोग? काम कुठपर्यंत आलं? काय-काय घडलं, जाणून घ्या सर्व अपडेट्स..

Friday, 16 October 2026, 20:36

फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करण्यास मनाई! अनधिकृत ओळखपत्रांची निर्मिती व वितरण थांबविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Friday, 16 October 2026, 18:53

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा; पुणेकरांच्या तहानेचा प्रश्न ऐरणीवर! धरणातील पिण्याचे पाणी वाचवण्यासाठी मुंढवा जॅकवेल पूर्ण क्षमतेने चालवण्याची मागणी

Friday, 16 October 2026, 18:31
Next Post

गुगल पे, फोन पे, पेटीएम चालवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! २ ऑक्टोबरला यूपीआय ॲप्स बंद राहणार? व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे डिजिटल व्यवहारांना ब्रेक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp