अक्षय टेमगिरे

शिक्रापूर : गणेशोत्सवाच्या जल्लोषात नागरिकांचा आनंद अबाधित राहावा आणि उत्सव काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी शिक्रापूर पोलिसांनी सायबर फ्रॉड आणि महिला सुरक्षा या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गणेश मंडळांना प्रत्यक्ष भेटी देत पदाधिकारी व नागरिकांशी संवाद साधून जनजागृती केली.

गणेशोत्सवाच्या काळात मंडपांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते तसेच ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाणही वाढते याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सायबर फसवणुकीच्या विविध प्रकारांबाबत सावध केले असून.
अनोळखी लिंकवर क्लिक करणे ओटीपी सांगणे अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून यूपीआय व्यवहार करणे बनावट फोन कॉल किंवा सोशल मीडिया संदेशांना प्रतिसाद देणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले असून.
क्षणभराचा निष्काळजीपणा खात्यातील पैसे गमावण्यास कारणीभूत ठरू शकतो त्यामुळे कोणताही ऑनलाइन व्यवहार करताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी असा संदेश पोलिसांकडून देण्यात आले आहे.
दरम्यान, गणेशोत्सवातील गर्दीच्या पार्श्वभूमीवर महिला व बालकांच्या सुरक्षेलाही पोलिसांनी प्राधान्य दिले असून गणेश मंडळांमध्ये महिलांची व मुलींची मोठी उपस्थिती असते त्यामुळे छेडछाड गैरवर्तन अथवा संशयास्पद हालचाली आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनाही महिला सुरक्षेबाबत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आतापर्यंत २७ गणेश मंडळांना प्रत्यक्ष भेटी देऊन पदाधिकारी व नागरिकांशी संवाद साधला आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यातील दुय्यम अधिकारी व अंमलदारांनीही हद्दीतील विविध गणेश मंडळांना भेटी देऊन जनजागृती केली असून आतापर्यंत सुमारे १५० गणेश मंडळांपर्यंत पोलिसांचा सुरक्षा संदेश पोहोचविण्यात आला आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेली सायबर गुन्हे व महिला सुरक्षा विषयक जनजागृतीपर पत्रके गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि उपस्थित नागरिकांना वितरित करण्यात आली उत्सवाचा आनंद घेताना नागरिकांनीही पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
उत्सवाचा आनंद घेताना नागरिकांनी डिजिटल व्यवहारात सावध राहावे आणि महिलांच्या सुरक्षेबाबत सजग राहावे कोणत्याही प्रकारे महिला किंवा मुलींची छेड काढली जात असल्यास तत्काळ पोलिसांना कळवा अशा विकृतींवर पोलिसांना कायदेशीर कारवाई करता येईल.
-चंद्रशेखर यादव (पोलीस निरीक्षक शिक्रापूर)






