Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 5 July 2026, 21:55

पुणे: राज्यातील दूध भेसळ प्रकरणाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या संयुक्त मोहिमेत मोठे दूध भेसळ रॅकेट उघडकीस आले आहे. या कारवाईत १३ जणांना अटक करण्यात आली असून, सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्यातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त दूध पुरवले जात असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्याशी समन्वय साधून संयुक्त कारवाईची योजना आखली.

रविवारी पहाटे अन्न व औषध प्रशासन आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी एकाच वेळी पुणे जिल्ह्यातील मंचरसह अहिल्यानगर, सांगली, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड आणि सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे छापेमारी केली. या कारवाईत अनेक ठिकाणी भेसळयुक्त दूध तयार करण्याचा प्रकार उघडकीस आला.

तपासादरम्यान मंचर हे या रॅकेटचे प्रमुख केंद्र असल्याचे समोर आले. तसेच खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील काही ठिकाणीही छापे टाकण्यात आले. या ठिकाणांहून राज्यातील विविध भागांत रासायनिक भेसळ केलेल्या दुधाचा पुरवठा होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

 

प्राथमिक तपासात आरोपी शुद्ध दुधात मोठ्या प्रमाणावर रासायनिक मिश्रण मिसळून त्याचा पुरवठा करत असल्याचे समोर आले आहे. १,००० लिटर शुद्ध दुधात सुमारे ५०० लिटर रासायनिक मिश्रण, तर ५०० लिटर दुधात सुमारे ३०० लिटर भेसळयुक्त द्रव्य मिसळले जात असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. हा प्रकार गेल्या दोन वर्षांपासून सुरू असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.

या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासनाने जनतेच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या सर्व संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘दादा आज तू नाही पण…’ अजितदादांच्या निधनानंतरचं पाहिलं रक्षाबंधन; दादांच्या आठवणीत सुप्रिया सुळे यांची डोळे पाणावणारी पोस्ट

Friday, 28 August 2026, 11:00

तिने अंतर्वस्त्रात लपवली चिठ्ठी अन् केली आत्महत्या; भाजप नेत्याच्या सुनेने ‘या’ कारणामुळे उचललं टोकाचं पाऊल; पोस्टमार्टमवेळी उलगडलं गूढ

Friday, 28 August 2026, 10:59

जरांगे म्हणत होते, अखेर तेच झालं! ‘कुणबी’चे पिढ्यान्‌पिढ्यांचे पुरावे, तरी जात वैधता नाकारली; आरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह

Friday, 28 August 2026, 10:43

प्रेमापोटी फुटला MPSC चा पेपर! संशय येऊ नये म्हणून १० प्रश्न मुद्दाम चुकवण्याचा होता प्लॅन; खळबळजनक माहिती समोर

Friday, 28 August 2026, 10:30

मागून आला अन् चाकूने केले सपासप वार! पुण्यात महिला अन् चिमुकल्यासमोर तरुणाची निर्घृण हत्या

Friday, 28 August 2026, 10:03

Gold Silver Price Today: गेल्या २४ तासातच सोन्याचे दर उतरले! सलग चार दिवसांच्या तेजीनंतर दरात मोठी घसरण; सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांसाठी खरेदीची सुवर्णसंधी

Friday, 28 August 2026, 9:56
Next Post

Kasyno Xon Bet – Innowacyjne Podejście do Standardowej Zabawy Polskiego Kasyna

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp