Pune News : पुणे : वाघोलीतील एका घरफोडी प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील घरफोडी करून पसार झालेल्या दोन चोरट्यांना अवघ्या २४ तासांत पोलीसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि वेगवेगळ्या कंपनीचे ५ मोबाईल फोन असा एकूण ३ लाख ४७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने ही कारवाई केली आहे.
३ लाख ४७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार सुरेश गोसावी (वय २१, रा. सहारा प्रेस्टिजजवळ, जगदाळे निवास, भेकराईनगर, फुरसुंगी, पुणे) आणि एक अल्पवयीन मुलगा अशी अटक आरोपींची नावे आहेत. वाघोलीतील एका घरामध्ये ही घरफोडी झाली होती. (Pune News) या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाच्या तपास पोलीस करत होते. या वेळी गुन्हे शाखा युनिट ६ च्या पोलिसांना माहिती मिळाली की, चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी हडपसर येथे असून, त्याच्याकडे एक क्रमांक नसलेली दुचाकी आहे.
दरम्यान, आरोपीची माहिती मिळताच पोलीसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. गुन्ह्याबाबत चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता, अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याचे त्याने कबूल केले. (Pune News) दरम्यान, पोलीसांनी दुसऱ्या अल्पवयीन साथीदारालाही ताब्यता घेतले. त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि वेगवेगळ्या कंपनीचे ५ मोबाईल फोन असा एकूण ३ लाख ४७ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.