Pune News : पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रसिद्ध असलेल्या हॉटेल वैशालीमध्ये खवय्यांची नेहमीच गर्दी असते. सध्या हे हॉटेल एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. हॉटेलच्या मालकीवरुन पती-पत्नीमध्येच वाद रंगला आहे. हॉटेलच्या मालकिणीची बनावट स्वाक्षरी करुन सदनिकेवर पाच कोटी रुपयांचे तारण कर्ज काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वैशाली हॉटेलच्या मालकिणीने दिलेल्या फिर्यादीनुसार पतीसह बँक अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पतीसह दोघांवर गुन्हा दाखल
वैशाली हॉटेलच्या मालक निकिता शेट्टी आहेत. त्यांचा पती विश्वजीत विनायक जाधव आणि इतरांकडून हे हॉटेल बळकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (Pune News) विश्वजीत जाधव यांनी आपली खोटी सही करुन फ्लॅट तारण ठेवला. त्यानुसार पाच कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप निकिता शेट्टी यांनी केला आहे. त्यानुसार, जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता आणि त्यांचे पती विश्वजीत यांच्यात वैशाली हॉटेलच्या मालकीवरुन वाद सुरू आहेत. याबाबत दोघांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. निकिता यांना विश्वासात न घेता पती विश्वजीत यांनी बँक अधिकाऱ्यांची भेट घेतली. निकिता यांची बनावट स्वाक्षरी करुन बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. निकिता यांच्या परवानगीशिवाय सदनिका बँकेकडे तारण ठेवून चार कोटी ९७ लाख रुपयांचे कर्ज काढण्यात आल्याचे निकिता यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत निकिता जगन्नाथ शेट्टी (वय ३४, रा. मोदीबाग, शिवाजीनगर) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune News) त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती विश्वजीत विनायक जाधव (वय ४१) यांच्यासह कोटक महिंद्रा बँकेच्या येरवडा शाखेचे व्यवस्थापक राजेश देवचंद्र चौधरी, डीएसए आर. आर. फायनान्सचे रवि परदेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हॉटेल वैशालीची मालकीही विश्वजीत जाधव यांनी आपल्याला नशा देऊन काढल्याचा आरोप निकीता शेट्टी यांनी केला आहे.
पुण्यात १९४९ मध्ये जगन्नाथ शेट्टी यांनी हे हॉटेल बांधले. त्यानंतर त्यांनी व्यवसायात झेप घेतली. १९५१ मध्ये शहरात एकाच वेळी तीन हॉटेल त्यांनी सुरु केली. त्यात हॉटेल रुपाली, वैशाली आणि आम्रपाली यांचा समावेश आहे. पुणेकरांमध्ये दक्षिण भारतीय पदार्थ लोकप्रिय करण्याचे काम जगन्नाथ शेट्टी यांनी केले. (Pune News) त्यांच्या या कार्याची दाखल घेऊन अनेक सामाजिक संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. त्यात त्रिदल संस्थेने त्यांना “पुण्यभूषण पुरस्कार” दिला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : सिंहगड रस्त्यावरील दुचाकी विक्री दालनाला भीषण आग
Pune News : टोळीयुद्धातून तरुणाचा मृत्यू; आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह सहा साथीदार गजाआड