Pune News : पुणे : गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्यांकडून तब्बल 81 किलो 75 ग्रॅम वजनाचा गांजा पुणे पोलीसांच्या अंमली पदार्थ पथकाने जप्त केला आहे. ही कारवाई पुणे स्टेशन परिसरातील ताडीवाला रोडवरील रेल्वे गेटच्या समोर करण्यात आली आहे. पोलीसांनी गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 16 लाख 35 हजार 100 रूपये आहे. ( 81 kg canabis worth Rs 16 lakh seized near Pune Station area)
दोघे अटकेत
शशिकांत चांगदेव नलावडे (29, रा. मु.पो. धनगरवाडी, कोडोली, सातारा ) आणि प्रतिक युवराज ओहोळ (19, रा. मु.पो. सालसे, ता. करमाळा, सोलापूर ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune News) याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्टेशन परिसरात अंमली पदार्थ पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी व पोलिस अंमलदार गस्त घालत होते. त्यावेळी पोलीसांना या भागात आरोपी हे गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. (Pune News) त्यानंतर पोलीसांनी सापळा रचला व आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल 81 किलो 755 ग्रॅम वजनाचा 16 लाख 35 हजार 100 रूपये किंमतीचा गांजा, 20 हजार रूपये किंमतीचे 2 मोबाईल फोन आणि 3 हजार रूपयाच्या दोन बँग तसेच 1150 रोख असा एकुण 16 लाख 59 हजार 250 रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News | पुण्यातील महर्षीनगरात डोळ्यात मिर्ची पुड टाकून एकावर कोयत्याने वार
Pune | अल्पवयीन मुलाला पळवून नेत पदवीधर विद्यार्थिनीने आळंदीत केला विवाह…
Pune News : पुण्यातील कल्याणीनगरमधील आयटी कंपनीत भीषण आग; आगीत कर्मचारी अडकले