Pune News : पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे-दौंड मार्गावर तसेच पुणे स्थानकात विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली. या मोहीमेअंतर्गत एकाच दिवसात १ हजार ३१७ विनातिकीट प्रवासी पकडले. त्यांच्याकडून ११ लाख ३८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
प्रवासी गाड्यांमध्ये आणि पुणे स्थानकात विशेष तपासणी मोहीम
विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईचा दंडुका उगारला आहे. (Pune News) कोणत्याही मार्गावर अचानकपणे विशेष तपासणी मोहीम राबविली जात आहे. दरम्यान, २० ऑक्टोबरला पुणे-दौंड मार्गावर विविध प्रवासी गाड्यांमध्ये आणि पुणे स्थानकात ही मोहीम राबविली. त्यात ६४ तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या मोहिमेत १ हजार ३१७ विनातिकीट प्रवासी पकडले असून, त्यांच्याकडून ११ लाख ३८ हजार रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या संयोजनात व विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : …अशा सरकारला जनतेने अद्दल घडवावी – खासदार सुप्रिया सुळे यांचे टीकास्त्र