पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या करणाऱ्या आठ आरोपींना पोलिसांनी अटक केलं आहे. मोहोळ गँगचा म्होरक्या असणाऱ्या शरद मोहोळच्या हत्यने पुण्यासह राज्यात मोठी खळबळ उडाली. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्याच्याच घराच्या १५० मीटर अंतरावर साथीदारांनी मोहोळवर बेछुट गोळीबार केला. या घटनेत मोहोळचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, मुन्ना पोळेकर हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून शरद मोहोळ सोबत तो त्याच्या सावलीप्रमाणे राहत होता. पोलिसांनी एकूण ८ जणांना या प्रकरणामध्ये अटक केली आहे. मुन्ना पोळेकर हा मुख्य आरोपी असला तरी खरा मास्टरमाईंड कोण हे समोर आलं आहे. पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रभारी सह आयुक्त आणि अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी याबाबत खुलासा केला आहे.
खरा मास्टरमाईंड कोण?
कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येमधील आरोपी नामदेव कानगुडे आणि विठ्ठल गडले यांचं पुर्ववैमनस्य होतं. रेकॉर्डमध्ये मोहोळ आणि यांच्यात काही दिवसापूर्वी वाद झाले होते. शरद मोहोळ याला नियोजनबद्ध प्लॅनिंग करून संपवलं असल्याचं समोर आलं आहे. मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ याच्या घरापासून काहीच अंतरावर राहत आहे.
मोहोळ याच्याशी जवळीक वाढवण्यासाठी मुन्ना पोळेकर याने आधी मोहोळच्या विश्वासू आणि कायम सोबत राहणाऱ्या पोरांशी ओळख निर्माण केली. नंतर मुन्ना पोळेकर हा त्याच्या टोळीत चांगलाच सक्रीय होवून मोहोळच्या जवळ आला होता. गेल्या पंधरा दिवसांपासून मोहोळच्या ऑफिससह तो त्याच्यासोबत फिरत होता. पोळेकर त्याचा मामा नामदेव उर्फ पप्पू कानगुडेचाच माणूस होता. आरोपींमधील विठ्ठल गडले आणि नामदेव कानगुडे यांची आधीची भांडणं होतीच, त्यामुळे काटा काढण्यासाठी त्यांनी भाच्याला म्हणजचे मुन्ना पोळेकरला मोहरं बनवलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुन्ना पोळेकरने गेल्या काही दिवसांपासून मोहोळ याच्याशी चांगलीच जवळीक वाढवली होती. नामदेव कानगुडे आधी पुण्यातच राहत होता त्यानंतर तो भूगावला राहायला गेला. तर पोळेकर आणि शरद मोहोळ यांच्या घरामध्ये दोनशे ते तीनशे मीटरचं अंतर होतं. प्लॅनिंगनुसार पोळेकरने माहोळच्या जवळ असणाऱ्या पोरांच्या मदतीने जवळीक वाढवली.
मोहोळला संपवण्यासाठी त्यांनी लग्नाच्या वाढदिवसादिवशी घरी गेले जेवण केलं. मोहोळ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी चालला होता तेव्हा आधीच एक शूटर बाहेर दबा धरून बसला होता. मोहोळला बाहेर काढल्यावर पाठिमागून त्याच्यावर मुन्ना पोळेकरने गोळ्या झाडल्या. दरम्यान, समोर आलेली माहिती पाहता मुन्ना पोळेकर याचा मामा नामदेव कानगुडे आणि विठ्ठल गडले मास्टर माईंड आहेत. मुन्नाला मोहरा बनवत त्यांनी मोहोळला संपवलं.