उरुळी कांचन, (पुणे) : शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप व महायुत व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटकेयांच्या निवडणूक प्रचारार्थ लोणी काळभोरनंतर उरुळी कांचन शहरात निघालेल्या प्रचार फेरीला नागरिकांच्या उपस्थितीचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने प्रतिस्पर्धी विरोधी उमेदवार चांगलेच धास्तावले आहेत.
ज्ञानेश्वर कटके महायुतीकडून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांना शिरूर – हवेली विधानसभा मतदार संघातील गावात उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गावा गावातील उस्फूर्त प्रतिसादानंतर त्यांनी आपला मोर्चा आता मोठ्या लोकवस्तीच्या गावांबरोबरच शहराकडे वळविला आहे. त्यानुसार त्यांनी उरुळी कांचन शहरात निवडणूक प्रचाराची फेरी काढली. या निवडणूक प्रचार फेरीला उरुळी कांचन व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार मात्र निवडणूक प्रचार फेरीला मिळालेल्या उत्तम प्रतिसादाने चांगलेच धास्तावले आहेत.
उरुळी कांचन येथील ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी तरुणांचा व महिलांचा मोठा सहभाग असल्याचे दिसून आले. मतदारांच्या गाठीभेटी घेत तेथील समस्या जाणून घेतल्या. पूर्व हवेलीसह शिरूरच्या विकासासाठी आपण निवडणूक रिंगणात असून, मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणे व सर्व भागात समतोल राखणे हाच आपला अजेंडा असल्याचे कटके यांनी यावेळी सांगितले.
ग्रामस्थांच्या सत्काराला उत्तर देताना माऊली कटके म्हणाले, आपला उद्याचा आदर्श मतदारसंघ घडविण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. मागील कित्येक वर्षे या मतदारसंघात कामे झाली आहे, अशा फुशारक्या सुरू आहे. स्वतः वर विविध विशेषने जोडीत मतदारसंघाचा विकास केला म्हणायचा परंतु तसे चित्र पाच वर्षात झाले का? असा प्रश्न शिरुर-हवेलीत फिरताना दिसत आहे. आम्ही महिलांना तिर्थ दर्शनाला नेले म्हणून टिका होते. परंतू पुढील काळात विविध तिर्थक्षेत्रांचा नागरीकांना लाभ होणारच असे त्यांनी सांगितले.
या गावभेट दौऱ्यासाठी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, हवेली बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, लक्ष्मण केसकर, रोहिदास उंद्रे, सुदर्शन चौधरी, राष्ट्रवादी प्रदेश सचिव गुलाब चौधरी, उरुळी कांचनचे सरपंच अमित कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, राजेंद्र कांचन, अजिंक्य कांचन, अलंकार कांचन, सुरज चौधरी, सुजीत चौधरी, विकास जगताप, श्रीकांत कांचन, अमित कांचन, दिलीप गाडेकर, शंकर बडेकर, जितेंद्र बडेकर, सुभाष बगाडे, युवराज कांचन, आदित्य कांचन, राहुल तांबे आदी तिन्ही पक्षाचे पदाधिकारी, महिला व मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.