Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात दिगंबर जैन हुमड समाज संस्कृती, शिक्षण व संस्कार संवर्धनाचे सुसज्ज केंद्र व्हावे : मुनी अमोघकीर्ती महाराज

दीपक खिलारेby दीपक खिलारे
Thursday, 14 November 2024, 14:35

-दीपक खिलारे

इंदापूर : पुणे हे विद्येचे माहेरघर असून शहरात भारत वर्षीय दिगंबर जैन हुमड समाज संस्कृती, शिक्षण व संस्कार संवर्धनाचे महत्वपूर्ण केंद्र होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन श्री 108 मुनी अमोघकीर्ती महाराज यांनी केले.

फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीने पुणे माणिकबाग येथील श्री 1008 भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर सभागृहात आयोजित पुणे जिल्हास्तरीय मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी फेडरेशनचे नूतन शिरोमणी संरक्षक, फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. रविकिरण शहा यांचा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष विपीन गांधी, राष्ट्रीय महामंत्री महेंद्र बंडी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

यावेळी अमोघकिर्ती महाराज पुढे म्हणाले, हुमड समाजाची निर्मिती आचार्य माघनंदी महाराज यांचे शिष्य हेमचंद्र मुनी महाराज यांच्यामुळे झाली. हुमड चा अर्थ हुशार, मनन शील आणि धाडशी गुण असलेला समाज असा असून वालचंद, हिराचंद सारखा कृषीऔद्योगिक क्रांती करणारा उद्योगपती या समाजाने देशाला दिला आहे. समाजाची लोकसंख्या फक्त 1 लाख 20 हजार असून समाजात दसा व बिसा हुमड असे पंथ भेद असले तरी त्यांचे 18 गोत्र एकच आहेत. त्यामुळे हे भेद मिटून समाज एकसंघ होणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर फेडरेशनचे कार्य आदर्श व स्तुत्य असून फेडरेशनने गुजरात मधील आपले मूळस्थान असलेल्या इडर जवळील खेडब्रह्मा येथे देखील मोठे सांस्कृतिक केंद्र उभे करावे, म्हणजे आपल्या कुलदैवत, देवीचे दर्शन, कुलाचार करण्यासाठी वर्षातून एकदा सर्व समाज तेथे एकत्र येईल, अशी सूचना त्यांनी केली.

यावेळी हुमड जैन फेडरेशन आंतरराष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष विपीन गांधी म्हणाले, फेडरेशन ची स्थापना सन 2007 मध्ये झाली असून सध्या 4 हजार महिला व 10 हजार पुरुष सुई दोऱ्या प्रमाणे समाज एकत्र करण्याचे काम करत आहेत. पुणे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे हुमड केंद्र स्थापन करण्यात येणार असून यामध्ये दिगंबर जैन शिक्षण, संस्कृती व संस्कार केंद्र, मुला मुलींसाठी सुसज्ज वसतिगृह, वृद्धाश्रम, आरोग्य मंदिर, त्यागी निवास व आहार व्यवस्था आदींची सोय करण्यात येणार आहे. मुलांना शिष्यवृत्ती व गंभीर आजाराच्या रुग्णांना ऑपरेशनसाठी मदत करण्यात येत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी त्यासाठी आपले भरीव योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी श्री 108 दिगंबर मुनी अमरकिर्ती महाराज, फेडरेशनचे राष्ट्रीय महामंत्री महेंद्र बंडी, चकोर गांधी, सुशील शहा, राष्ट्रीय महिला अध्यक्षा सुजाता शहा यांची भाषणे झाली.

यावेळी किरणकुमार शहा, विपीन गांधी, महेंद्र बंडी, शकुंतला बंडी, चकोर गांधी, किशोर शहा, राजमल कोठारी, मिहिर गांधी, डॉ. श्रेणिक शहा, सुरेंद्र गांधी, सूर्यकांत शहा, सुजाता शहा, संज्योत व्होरा, चेतन शहा वाल्हेकर, अतुल गांधी, अमृत गांधी, वीरकुमार शहा, डॉ. संदेश शहा, अक्षय दोशी आदींचा समाजसेवी कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रास्ताविक सूत्रसंचलन फेडरेशनचे माजी अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा यांनी केले तर आभार प्रदर्शन वीरेंद्र शहा यांनी मानले.

दीपक खिलारे

दीपक खिलारे

पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. दोन वर्ष दैनिक बंधुप्रेम, एक वर्ष ग्रामीण महाराष्ट्र वेब पोर्टल व यू ट्यूब चॅनेल तसेच तीन वर्ष दैनिक बारामती प्राईड मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या पाच महिन्यांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

सोनं पुन्हा महागलं! आठवड्यात मोठी उसळी;24 कॅरेटचा भाव ₹1,44,930 प्रति तोळा,जाणून घ्या आजचे दर

Sunday, 26 July 2026, 11:39

मुंबईत ठाकरे बंधूंचा एल्गार; रॅलीपूर्वी संदीप देशपांडेंच्या टी-शर्टने वेधलं लक्ष, भाजपलाही टोला!

Sunday, 26 July 2026, 11:00

IT कंपनीत नोकरीचं स्वप्न पडलं महागात! मोबाईलवरील एका मेसेजनं पुण्यातील तरुणाला लाखोंचा गंडा

Sunday, 26 July 2026, 10:27

एकाच वेळी 70 विद्यार्थी आजारी; मळमळ, उलट्या अन् चक्कर… अमरावतीच्या आश्रमशाळेत नेमकं काय घडलं?

Sunday, 26 July 2026, 9:15

पुण्यातील गोळीबार प्रकरण भोवलं! गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या,पोलीस आयुक्तांचा दणका

Sunday, 26 July 2026, 8:49

पुण्यात रोगराईचा कहर! डेंग्यूसह साथीच्या आजारांनी वाढवली चिंता; 5,500 हून अधिक रुग्ण

Sunday, 26 July 2026, 8:26
Next Post

पुणे मेट्रो ही विकासातील महत्त्वाची गुरुकिल्ली : प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.