इंदापूर : दीपक खिलारे
Indapur News : इंदापूर, (पुणे) : इंदापूर बसस्थानकातील (Indapur Bus Stand) स्लॅब कोसळल्याची (slab collapse) घटना रविवारी (ता. २३) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेने बसस्थानकातील प्रवाशांमध्ये (passengers)एकच गोंधळ (confusion) उडाला होता.
दुसऱ्या क्रमाकांचे अत्याधुनिक सोई-सुविधांयुक्त एस.टी. बसस्थानक म्हणून इंदापूर बसस्थानकाची नोंद..
महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमाकांचे अत्याधुनिक सोई-सुविधांयुक्त एस.टी. बसस्थानक म्हणून इंदापूर बसस्थानकाची नोंद आहे. ‘बांधा व हस्तांतरीत करा’ या तत्वावर तीस वर्षाच्या करारावर या बसस्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. सन २००५ साली या बसस्थानकाचे लोकापर्ण करण्यात आले आहे.
दरम्यान, दुपारी स्लॅब कोसळण्याच्या घटनेने या बसस्थानकात येणाऱ्या हजारो प्रवाशांची सुरक्षितता राम भरोसे असल्याचे दिसून आले. संबंधित विभागाने या घटनेची दखल घेऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेकरीता उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
Indapur | इंदापूर शहरात परशुराम जन्मोत्सव उत्साहात संपन्न
Indapur | इंदापूर येथे महिला भगिनींसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन