शुभम वाकचौरे
जांबूत : डुंबरवाडी ता. जुन्नर जि. पुणे येथील टोलनाक्यावरून महेश विश्वास सुपेकर वय 23 वर्ष रा. नांदूर खंदरमाळ ता. संगमनेर जि. अहमदनगर यांचा एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचा ॲपल कंपनीचा आयफोन फिफ्टीन प्रो गहाळ झाला होता. या मोबाईलची पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली होती. दरम्यान, ओतूर पोलिसांनी गहाळ झालेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून लोकेशन काढले असता, जुन्नर या ठिकाणी असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर एक पथक तयार करून मोबाईलचा शोध सुरु केला, दरम्यान, अखेर पोलीस प्रशासनाला मोबाईल शोधण्यात यश आलं. जुन्नर, ता. जुन्नर जि. पुणे या ठिकाणी मोबाईल मिळाला असून महेश विश्वास सुपेकर वय 23 रा. नांदूर, ता. संगमनेर जि. अहमदनगर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे. शक्यतो गहाळ झालेले मोबाईल परत मिळत नाही.
परंतु पूणे जिल्ह्यात ओतूर पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष अधिकारी सचिन कांडगे यांच्या सतर्कतेमुळे या ठिकाणी जनतेला योग्य न्याय मिळतो. त्यामुळे त्या ठिकाणी गुन्ह्यांचे प्रमाणही कमी झाले असून गहाळ झालेल्या वस्तू नागरिकांना परत मिळत असल्याने त्यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी सचिन कांडगे यांच्या कामाचे कौतुक विविध स्तरातून केले जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे पुणे ग्रामीण त्याचप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी जुन्नर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, पोलीस रोहित बोंबले यांनी केली आहे.