Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी धामणी : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा हंगामासाठी ऊसदर जाहीर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 29 November 2023, 16:10

राजु देवडे

लोणी धामणी : अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये गाळप होणा-या ऊसास पहिली उचल रु. २९५०/- प्रती मे. टनाप्रमाणे देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री व कारखान्याचे संस्थापक-संचालक मा. ना. श्री. दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मा. संचालक मंडळ सभेमध्ये निर्णय घेण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

पुढे बोलताना बाळासाहेब बेंडे म्हणाले की, कारखान्याने आत्तापर्यंत कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतक-यांना नेहमीच चांगला दर दिलेला आहे. गाळप हंगाम २०२३-२४ करिता केंद्र शासनाने दिनांक ०६/०७/२०२३ चे परिपत्रकान्वये द्यावयाचा एफ. आर. पी दर निश्चित केलेला आहे. त्याप्रमाणे कारखान्याचा सन २०२२-२३ गाळप हंगामातील सरासरी साखर उताऱ्यानुसार एफ.आर.पी दर रु. २८५३. ५७ प्रती मे. टन येत आहे.

 

तथापी सन २०२३-२४ हंगामात गाळप होणा-या ऊससाठी पहिली उचल रु. २९५०/- प्रती मे. टन देण्याचा निर्णय घेतलेला असून पंधरावडा ऊस बिलाप्रमाणे उत्पादक शेतक-यांच्या बॅंक खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतक-यामध्ये आंनदाचे वातावरण आहे. कारखान्याचा सन २०२३-२४ चा गाळप हंगाम दिनांक ०७/११/२०२३ रोजी सुरु झाला असून आज अखेर १ लाख ५५ हजार मे.टन ऊसाचे गाळप झालेले असून हंगामात कारखाना कार्यक्षेत्र व परिसरात झालेल्या नोंदीनुसार ९.०० लाख मे.टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे.

त्यादृष्टीने ट्रक / ट्रॅक्टर टोळीसह, ट्रॅक्टर टायरगाडी, बैलटायरगाडी व हार्वेस्टरचे करार केलेले असून त्याप्रमाणे यंत्रणा हजर झालेली आहे. कारखान्याने आधुनिकीकरण व विस्तारीकरणाची कामे केल्यामुळे गाळप क्षमतेत वाढ झालेली असल्याने ऊस उत्पादकांचे संपूर्ण ऊसाचे वेळेत गाळप होण्यास मदत होणार आहे. तरी कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतक-यांनी भीमाशंकर कारखान्यास जास्तीत जास्त ऊस गाळपास देवून सहकार्य करावे असे आवाहन व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी केले.

जाहीर केलेला दर रु. २९५०/- प्रति मे.टन पहिली उचल असून अंतिम उस दर प्रथेप्रमाणे कारखान्याचे संस्थापक संचालक व राज्याचे सहकार मंत्री मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील हे कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर करत असतात त्यामुळे जास्तीचा उस दर मिळणे अपेक्षित आहे. असे कारखान्याचे चेअरमन मा.श्री. बाळासाहेब बेंडे यांनी सांगितले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:59

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

Saturday, 4 July 2026, 12:26

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

Saturday, 4 July 2026, 12:16

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

Saturday, 4 July 2026, 12:09

पुणे–सोलापूर महामार्गावर राडा! पिकअप आडवी लावून एसटी चालकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 12:02
Next Post

'आय लव पाचगणी' फेस्टिवलमध्ये थिरकणार नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकरची पावले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.