Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केडगावमध्ये दांपत्यावर जीवघेणा हल्ला; मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 4 July 2026, 12:09

यवत, ता. ४ : केडगाव (२२ फाटा, ता. दौंड) परिसरात शेतात चारा आणण्यासाठी निघालेल्या दांपत्याला अडवून तिघा अज्ञातांनी बेदम मारहाण करत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील दागिने आणि पतीचा मोबाईल असा सुमारे ८० हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, याच रात्री परिसरातून एका नागरिकाची दुचाकीही चोरीला गेल्याने या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद अल्लीभाई शेख (वय ३७) हे पत्नी तब्बसुम आणि कुटुंबासह केडगाव (२२ फाटा) येथे वास्तव्यास असून शेती व्यवसाय करतात. २९ जून रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास ते पत्नीसह शेतातून गुरांसाठी चारा आणण्यासाठी जात होते. यावेळी शेताजवळून पायी येणाऱ्या तिघा अनोळखी इसमांनी त्यांना अडवून चौकशी केली. काही क्षणातच एका आरोपीने जावेद शेख यांच्या खिशातील मोबाईल हिसकावला. त्यांनी विरोध करत मोबाईल परत मागितल्यावर तिघांनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

पतीला वाचवण्यासाठी पत्नी तब्बसुम मध्ये पडताच आरोपींनी त्यांना जोरात ढकलून खाली पाडले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र आणि दोन्ही कानातील बुगड्या जबरदस्तीने काढून घेतल्या. दांपत्याने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी खुटबावच्या दिशेने पळून गेले. या घटनेत सुमारे ४० हजारांचे मंगळसूत्र, ३० हजारांच्या सोन्याच्या बुगड्या आणि १० हजारांचा रेडमी मोबाईल, असा एकूण ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.

 

दरम्यान, याच रात्री केडगाव येथील तुषार हरिभाऊ मोरे यांच्या घरासमोर उभी असलेली हिरो एचएफ डिलक्स (एमएच-४२ बीक्यू-९१४७) ही दुचाकीही चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात तिघा अज्ञात आरोपींविरुद्ध जबरी चोरी, मारहाण आणि धमकीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपींचा शोध सुरू आहे. फिर्यादीने आरोपी पुन्हा समोर आल्यास ओळखू शकत असल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

NEET नंतर आता महाराष्ट्रातही पेपरफुटी! 100 पैकी 90 प्रश्न आधीच व्हायरल; विद्यार्थ्यांमध्ये संताप

Monday, 27 July 2026, 10:37

चालता-चालता बॉक्सला लागला हात अन् ६३ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू; पुण्यात नेमकं काय घडलं? वाचा

Monday, 27 July 2026, 10:11

अमेरिका-इराण तणाव कमी होताच कच्चे तेल झाले स्वस्त, आता पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

Monday, 27 July 2026, 9:01

आता ‘तारीख पे तारीख’ नाही! हिंजवडी मेट्रोच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम; ‘या’ तारखेपासून धावणार मेट्रो

Monday, 27 July 2026, 8:51

पेपरफुटी करणाऱ्यांची आता खैर नाही! 10 वर्षांचा तुरुंग, 10 कोटींचा दंड; केंद्र सरकारने आणला कठोर कायदा

Monday, 27 July 2026, 8:38

आधी प्रेम, मग लग्नाचं आश्वासन… शेवटी 1.11 कोटी घेऊन महिला फरार; पुण्यातील घटना

Monday, 27 July 2026, 8:25
Next Post

तोबरेवस्तीत गाभण शेळ्या, बोकडांची चोरी; शेतकऱ्याचे 35 हजारांचे नुकसान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.