Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लग्नानंतरचा छळ असह्य! माहेरून 3 लाख रुपये आणण्याची सक्ती; विवाहितेची पतीसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 4 July 2026, 12:26

फुरसुंगी, ता. 4 : लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच माहेरून पैसे आणण्यासाठी वारंवार दबाव, शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक छळ सहन करावा लागल्याचा गंभीर आरोप एका विवाहितेने केला आहे. पतीच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी माहेरून तीन लाख रुपये आणण्यास भाग पाडल्याचा तसेच वारंवार अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत महिलेने पती, सासू, सासरे, दीर आणि नणंद यांच्याविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पती रोहित गौतम जाधव, सासू लंका जाधव, सासरे गौतम भगवान जाधव, दीर सागर जाधव आणि नणंद छाया कांबळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका २९ वर्षीय विवाहितेने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा विवाह १ मे २०२२ रोजी रोहित गौतम जाधव याच्याशी झाला होता. लग्नासाठी माहेरच्या कुटुंबाने सुमारे साडेबारा लाख रुपये खर्च केल्याचा तसेच सोन्याचे दागिने व संसारोपयोगी साहित्य दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस संसार सुरळीत सुरू होता. मात्र, हनिमूनवरून परतल्यानंतर पती, सासू, सासरे, दीर आणि नणंद यांनी किरकोळ कारणांवरून वाद घालण्यास सुरुवात केली. हनिमूनचा खर्च आणि पतीवरील तीन लाख रुपयांचे कर्ज माहेरून आणण्याची मागणी करत वारंवार मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संसार टिकावा म्हणून फिर्यादी यांच्या वडिलांनी व्याजाने तीन लाख रुपये उभे करून पतीला दिले. तरीही छळ थांबला नाही. “तू दिसायला चांगली नाहीस, मी जबरदस्तीने लग्न केले,” अशा शब्दांत पतीकडून वारंवार अपमान करण्यात येत असल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच, अपत्य होत नसल्याच्या कारणावरून “तू वांझोटी आहेस” असे टोमणे मारून मानसिक छळ करण्यात आला. माहेरी जाण्यावरही निर्बंध घालण्यात आले असून, विरोध केल्यास शिवीगाळ व मारहाण होत असल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले आहे.

 

सततच्या त्रासाला कंटाळून अखेर महिलेने माहेरी आश्रय घेतला. त्यानंतर तिने फुरसुंगी पोलीस ठाण्यात धाव घेत पती रोहित गौतम जाधव, सासू लंका जाधव, सासरे गौतम भगवान जाधव, दीर सागर जाधव आणि नणंद छाया कांबळे यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

SIR फॉर्म प्रकरणात मोठी कारवाई!भाजप पदाधिकाऱ्याला अटक; 5 BLO अधिकाऱ्यांच तातडीन निलंबन

Saturday, 29 August 2026, 16:09

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर अपघातांना ब्रेक! शिरुर बायपासवर सर्व्हिस रोडची उभारणी, वाहतुकीला मिळणार सुरक्षित वाट

Saturday, 29 August 2026, 15:42

पुण्याच्या इनर रिंग रोडला वेग! भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांचे आदेश

Saturday, 29 August 2026, 15:16

मुख्याध्यापकांच्या भेटीनंतर काही क्षणांतच अनर्थ! नाशिकमध्ये 10वीच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

Saturday, 29 August 2026, 14:59

पुणे शिक्षक मतदारसंघाचा पहिला उमेदवार ठरला;‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब

Saturday, 29 August 2026, 14:21

कालठणमध्ये प्रतिबंधित मांगूर माशांचे बेकायदेशीर संवर्धन; मत्स्य विभागाच्या तक्रारीवरून 2 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 29 August 2026, 13:49
Next Post

दौंड येथे घरात घुसून हिंदू तरुणीचे अपहरण! कमरुद्दीनने कुटुंबीयांना मारहाण करून तरुणीला ओढत नेलं, 5 लाखांची रोकड आणि 7 तोळे सोनंही केले लंपास; 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp