Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 4 July 2026, 17:28

सासवड, (पुणे) : काळुबाई मंदिर रस्त्यावर ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करून दागिने लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखा (LCB) व सासवड पोलिसांच्या पथकाने केला आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील फलटण येथून तीन सराईत आरोपींना अटक केली आहे.

बाळू ईश्वर माळी (वय -52, रा. गिरवी नाका, सगुनामाता नगर, मलटण, ता. फलटण, जि. सातारा), रोहित शिवाजी ननवरे (वय 28, रा. रविवार पेठ, फलटण, ता. फलटण, जि. सातारा) व दिलीप गोरख माळी (वय-45, रा. गोसावी गल्ली, सगुनामाता नगर, मलटण, ता. फलटण, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी सासवड, यवत आणि लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील जबरी चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्याकडून 5 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 मे रोजी राजकुमार विश्वनाथ हाके (वय 58, रा. कोंढवा खुर्द, पुणे) हे त्यांच्या मावस बहिणीसह पुरंदर तालुक्यातील पठारवाडी येथील काळुबाई मंदिराच्या रस्त्याने जात होते. त्यावेळी दोन मोटारसायकलवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्यांना अडवून बेदम मारहाण केली. आरोपींनी हाके आणि त्यांच्या बहिणीकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरी करून पोबारा केला होता. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

या गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे व सासवड पोलीस करीत असताना ‘पॅशन’ आणि ‘सीडी डिलक्स’ या दोन मोटारसायकलींचा वापर झाल्याचे आणि आरोपी सासवड-लोणंद मार्गे फलटणच्या दिशेने पळून गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनाबातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, हा गुन्हा सातारा जिल्ह्यातील फलटण येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार बाळू माळी, दिलीप माळी आणि रोहित ननवरे यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे,एलसीबी आणि सासवड पोलिसांच्या संयुक्त पथकाने फलटण येथे छापा टाकून 30 जून 2026 रोजी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी सासवड, यवत, व लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली पॅशन व सीडी डिलक्स मोटारसायकल आणि सुमारे साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण 5 लाख 20 हजार रुपये मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी बाळू ईश्वर माळी याच्यावर सातारा जिल्ह्यात दरोडा आणि जबरी चोरीचे 2 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर दुसरा आरोपी दिलीप गोरख माळी याच्यावर सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत दरोडा आणि जबरी चोरीचे एकूण 3 गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सासवडचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक युवराज धोंडे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भोकरे, सासवडचे पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे तसेच अंमलदार सचिन घाडगे, संतोष तोडकर, महेश खरात, गुरूनाथ गायकवाड, विशाल भोरडे, अक्षय यादव, विकास कापरे, राहुल पवार, प्रविण शेंडे आणि तुषार लोंढे यांनी केली.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11
Next Post

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.